PHOTOS

140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...

...
Advertisement
1/7
140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...
140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...

2019 Biggest Bollywood Flop Film: प्रत्येक वर्षी थिएटरमध्ये अनेक चित्रपट रिलीज होतात. यातील काही चित्रपट हिट होतात तर काही सुपरहिट. मात्र काही चित्रपट मात्र सुपरफ्लॉप ठरतात. 2019मध्ये आलेला एक चित्रपट असाच फ्लॉप ठरला आहे. 

2/7
140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...
140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...

2019मध्ये चित्रपटगृहात असाच एक चित्रपट रिलीज झाला होता. यात 8 सुपरस्टार होते. करोडोंचा सेट उभारला होता. तसंच, बिग बजेटदेखील होता. चित्रपटांचे प्रमोशनदेखील तगडं केलं होतं. मात्र, प्रेक्षकांनीच या चित्रपटाकडे पाठ फिरवली. 

3/7

चित्रपट रिलीज झाल्यानंतर मात्र तो फारकाही जादू दाखवू शकला नाही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने फारशी कमाई करु शकला नाही. 

4/7

 आजच्याच दिवशी पाच वर्षांपूर्वी कलंक नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाक संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन आणि आलिया भट्ट ही तगडी स्टारकास्ट होती. या कलाकारांनी अनेक हिट चित्रपट केले आहे. इतकी लोकप्रिय स्टारकास्ट असतानाही बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही.

5/7

 या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी केलं होतं. तर करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला हे निर्माते होते. या चित्रपटासाठी भव्य सेटदेखील उभारण्यात आला होता. या चित्रपटासाठी 140 कोटींचे बजेट होते. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट फार काही चालला नाही. 

6/7

 या चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत होते. या जोडीने या आधीही दोन हिट फिल्म दिल्या होत्या. त्यामुळं हा चित्रपट हिट होईल अशी अपेक्षा होती.मात्र, तरीही या चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू मिळाला होता. 

7/7

स्टार कास्ट आणि तगडा बजेट असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. चित्रपट फ्लॉप होऊनही या चित्रपटाने 146 कोटींची कमाई केली होती. IMDBवर या चित्रपटाला 10पैकी 3 रेटिंग मिळाली होती. 





Read More