3 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केली होती 1200 कोटींहून अधिक कमाई. OTT वरही आठवडाभर केले होते राज्य. तुम्ही पाहिला का?
एक काळ असा होता की चित्रपट फक्त हे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत होते. त्यानंतर हे चित्रपट टीवहीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना अनेक महिने वाट बघावी लागायची.
पण आता तस राहिले नाही. प्रेक्षकांना त्यांचा आवडता चित्रपट थिएटरमध्ये पाहता न आल्यास त्यांना फक्त आता 56 दिवस वाट बघावी लागते.
कारण एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तर त्याला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी 56 दिवस लागतात. त्यानंतर तो ओटीटीवर स्ट्रीम होतो.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 57 देशांमध्ये आठवडाभर ओटीटीवर राज्य केलं. कोणता आहे तो चित्रपट? पाहूयात सविस्तर
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव 'RRR' आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच प्रचंड कमाई केली होती.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता.
ओटीटीवर प्रदर्शित होताच या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही आठवडाभर ओटीटीवर राज्य केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतो.
प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर सतत बघताना दिसत आहेत. या चित्रपटाने प्रचंड कमाई केली असून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.