दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. जे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करतात. ज्यामध्ये काहींना अवॉर्ड देखील मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो 37 दिवसांमध्ये बनवण्यात आला.
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर यामधील काही चित्रपटांना अवॉर्ड देखील मिळाले आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्याला एक-दोन नाही तर तब्बल 5 ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. या चित्रपटाला देशभरात प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती.
2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 37 दिवसांमध्ये बनवण्यात आला होता. यामध्ये एक सीन असा होता तो शूट करण्यासाठी 10 दिवस लागले होते.
आम्ही 'अनोरा'या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाची कहाणी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला ऑस्कर सारखे मोठ्या मंचावर 5 अवॉर्ड मिळाले आहेत.
यासोबत या चित्रपटातील एका सीनमध्ये युरा बोरिसोवने तिच्या सहकलाकार अभिनेत्री माइकी मेडिसनला खरच मारण्यासाठी सांगितले होते. कारण तो सीन ओरिजनल दिसावा यासाठी.
या चित्रपटाला बेस्ट फिल्म एडिटिंग आणि ओरिजिनल स्क्रीनप्लेसाठी अवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटाच्या बजेटसंदर्भात बोलायचं म्हटलं तर या चित्रपटाचे बजेट 52.42 कोटी रुपये इतके होते.
तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने 358.18 कोटींची कमाई केली होती. IMDb च्या रेटिंगमध्ये या चित्रपटाला 10 पैकी 7.7 रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर तुम्ही पाहू शकता.