Menstrual Leaves: मासिक पाळीच्या कालावधीमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही हा मागील बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा राहिला आहे. आता याच सुट्ट्यांचा मुद्दा अगदी मनोरंजन सृष्टीमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे. महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारा त्रास आणि स्वत:ला आलेला यासंदर्भातील अनुभवावर आघाडीच्या 21 वर्षीय अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणालीय ही अभिनेत्री पाहूयात...
मासिक पाळी सुरु असतानाही 21 वर्षीय अभिनेत्रीला चित्रिकरण करावं लागलं आणि तिची प्रकृती यामुळे बिघडली.
ही अभिनेत्री मालिकेच्या सेटवरच बेशुद्ध पडल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात...
या 21 वर्षीय अभिनेत्रीचं नाव आहे निहारिका रॉय. निहारिकाला अल्पावधितच प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
निहारिका सध्या 'प्यार का पहला नाम- राधा मोहन' या हिंदी मालिकेतील प्रमुख अभिनेत्री म्हणजेच लीड रोल करणारी अभिनेत्री आहे.
निहारिकाबरोबर या मालिकेमध्ये अभिनेता शब्बीर आहलूवालिया प्रमुख भूमिका साकारत आहे.
शब्बीर आणि निहारिका या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडत आहे.
निहारिकाने अभिनेत्री म्हणून तिचा प्रवास, या मालिकेमधील भूमिका, पाळीच्या काळात महिलांना दिली जाणारी सुट्टी, मोठ्या वयाच्या अभिनयाबरोबर रोमान्स यासारख्या विषयांवर 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात दिली जाणारी सुट्टी म्हणजेच मॅस्ट्रुएल लिव्ह मिळत नाही. अनेकदा अभिनेत्री त्रास सहन करुन शुटींग पूर्ण करतात. या समस्येवर निहारिकाने आपलं मत मांडलं.
आम्हाला खरोखरच मॅस्ट्रुएल लिव्ह मिळत नाही. मात्र आम्हाला त्याची गरज वाटते. त्या दिवसांमध्ये शुटींग करणं मला फार कठीण जातं, असं निहारिकाने सांगितलं.
एकदा पिरिएड्स सुरु असताना शुटींग सुरु होतं अन् तेव्हा मी बेशुद्ध पडले होते. त्यानंतर शुद्धीवर आल्यावरही मी शुटींग पूर्ण केलं, अशी आठवण निहारिकाने सांगितली.
अशा दिवसांमध्ये औषधं घेतल्यानंतरच शुटींग करता येतं. औषधं घेतली नाहीत तर शुटींग करणं फारच कठीण जाईल, असंही ही 21 वर्षीय अभिनेत्री म्हणाली.
त्यामुळेच महिलांना मॅस्ट्रुएल लिव्ह मिळाली पाहिजे असं मला वाटतं. किमान त्या 5 दिवसांपैकी पहिल्या 3 दिवसांमध्ये सुट्टी दिली गेली पाहिजे, अशी अपेक्षा निहारिकाने व्यक्त केली.
निहारिका ही हिंदी मालिकांमधील सर्वात लोकप्रिय सुनांपैकी एक आहे. तिची भूमिका सर्वांच्याच पसंतीस पडत आहे.