Auctioned Virginity For 18 Crore Rs: फोटोत दिसणाऱ्या तरुणीची जगभरात एका भलत्याच कारणाने चर्चा आहे. तिने हा एवढा अजब निर्णय काय घेतलाय याचा खुलासाही केला आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...
सध्या जगभरामध्ये या 22 वर्षीय तरुणीने घेतलेल्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. 18 कोटींना तिचं कौमार्य एका अभिनेत्याने विकत घेतलंय. पण हा निर्णय घेण्यामागे तिने काय कारण सांगितलं आहे ते अधिक थक्क करणारं आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
ब्रिटनमधील 22 वर्षीय लॉरा नावाच्या तरुणीने आपली व्हर्जिनिटी म्हणजेच कौमार्याचा सौदा केला आहे. या मुलीने आपलं कौमार्य तब्बल 18 कोटी रुपयांना विकलं असून ही बातमी समोर आल्यानंतर जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
एका ऑनलाइन एस्कॉर्ट एजन्सीच्या माध्यमातून लॉराने हा सौदा केल्याची माहिती समोर आली असून या लिलावामध्ये अनेक बडे राजकीय नेते, उद्योजक आणि प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाले होते.
एका मोठ्या हॉलिवूड सुपरस्टारने सर्वाधिक बोली लावत लाराचं कौमार्य विकत घेतलं आहे. सध्या इंटरनेटवर ही बातमी चांगलीच चर्चेत असून जगभरामध्ये लॉराचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य याबद्दल चर्चा सुरु आहे. दरम्यान हा निर्णय का घेतला याबद्दल लॉरानेही भाष्य केलं आहे.
लॉरा मँचेस्टरमध्ये राहते. आपण आपलं कौमार्य विकण्याचा निर्णय लक्झरी लाइफस्टाइल आणि आर्थिक सुरक्षेचा विचार करुन घेतल्याचं लॉराने स्पष्ट केलं आहे. "अनेक मुली काहीच न मिळवता आपलं कौमार्य गमावतात," असं म्हणत लॉराने आपल्याला ही चूक करायची नसल्याचं म्हटलं आहे. कौमार्य विक्री हा एक फायद्याचा सौदा ठरु शकतो असा विचार करुनच लॉराने हा निर्णय घेतल्याचे समजते.
"माझ्या या निर्णयावरुन लोकांना काहीही विचार करु द्या. मात्र मी जो निर्णय घेतला आहे तो माझा खासगी प्रश्न आहे. जगात लोक अनेक गोष्टी विकतात. घर, गाड्या, उद्योग अगदी आई-वडिलांचाही सौदा केला जातो. मग मी माझं कौमार्य का विकू शकत नाही?" असा सवाल लॉराने टीकाकांरांना केला आहे.
सिंड्रेला एस्कॉर्ट्स नावाच्या एका एस्कॉर्ट एजन्सीने महत्त्वाची भूमिका बजावली. याच माध्यमातून लॉराने आपलं कौमार्य विक्रीसाठी उपलब्ध करुन दिलेले. अनेक बड्या व्यक्ती या लिलावामध्ये सहभागी झाल्या. शेवटी एका हॉलिवूड अभिनेत्याने 18 कोटी रुपये मोजून लॉराचं कौमार्य विकत घेतलं. या कलाकाराने आपली ओळख जाहीर केलेली नाही.
लॉरा एका कट्टरतावादी धार्मिक कुटुंबात जन्मलेली मुलगी आङे. त्यानंतरही तिने हा निर्णय कोणताही मागचा पुढचा विचार न करता घेतला. मी या साऱ्याकडे एक आर्थिक व्यवहार म्हणून पाहतेय. या निर्णयाचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचं लॉराने म्हटलं आङे.
लॉराच्या या निर्णयावरुन इंटरनेटवर दोन गट पडले असून जोरदार चर्चा सुरु आहे. काहींना याला महिला सबलीकरणाचं वेगळं रुप असं म्हटलं आहे. तर अनेकांनी नैतिकता आणि सामाजिक मूल्यांना छेद देणारा हा निर्णय योग्य नसल्याचंही म्हटलं आङे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)