PHOTOS

₹2470000000000 ची मालकीण इवल्याश्या देशात किडनॅप! 25 वर्षीय भारतीय तरुणीला तिच्याच कारखान्यातून...

247000 Crore Owner Detained In This Country: ती तिच्या सौंदर्यासाठी आणि आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र भारतामधील आघाडीच्या तरुण उद्योजकांपैकी ती एक असून उद्योग समुहाच्या जगभरात परसलेल्या कंपन्यांचा कारभार ती पाहते. अचानक तिला तिच्याच कंपनीच्या कारखान्यातून बंदुकींचा धाक दाखवून ताब्यात घेण्यात आलं. आता या प्रकरणी तिच्या वडिलांनी थेट राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...

Advertisement
1/17

पूर्व आफ्रिकेतील एका छोट्याश्या देशात भारतातील एका नामवंत उद्योजक घराण्यामधील 25 वर्षीय तरुणीला डांबून ठेवलं असल्याचा आरोप तिच्याच उद्योगपती वडिलांनी केला आहे. त्यांनी या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना एक खुलं पत्र लिहून हा धक्कादायक आरोप केला आहे. ज्या घराण्याबद्दल बोलतोय त्या घराण्याची एकूण संपत्ती 3 बिलीयन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 247000 कोटी इतकी आहे.

2/17

ज्या तरुणीबद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे वसुंधरा ओस्वाल!

 

3/17

वसुंधाराचे वडील पंकज ओस्वाल आणि राधिका ओस्वाल हे दोघेही उद्योगजगतामधील मोठी नावं आहेत. ओस्वाल ग्रुप ग्लोबल या कंपनीचे मालक असलेल्या पंकज आणि राधिका यांची कन्या वसुंधार ही स्वत: पीआरओ इंडस्ट्रीजमध्येही कार्यरत असून फारच सक्रीय आहे.

4/17

पंकज यांनी केलेल्या दाव्यानुसार वसुंधराला 1 ऑक्टोबर 2024 पासून युगांडा या देशात डांबून ठेवण्यात आलं आहे. पंकज यांनी युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योविरी मुसीव्हेनी यांना एक खुलं पत्रही लिहिलं आहे. ज्यामध्ये माझ्या मुलीचे मूलभूत अधिकार डावलले जात असून तिला कायदेशीर मदतही केली जात नाहीये. तिला तिच्या कुटुंबाशीही संपर्क साधू दिला जात नसल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला आहे.

5/17

'इयू'च्या रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा 1 ऑक्टोबर रोजी एक्स्ट्रा नॅचरल अल्कोहोलच्या कारखान्याला भेट देण्यासाठी गेली होती. त्यावेळी काही सशस्र लोकांनी तिला ताब्यात घेतलं. आम्ही सरकारी कर्मचारी असल्याचं तिला या लोकांनी सांगितलं. 

6/17

कोणतंही वॉरंट न दाखवता आणि कोणतेही कारण न सांगता वसुंधराला ताब्यात घेण्यात आलं. वसुंधराच्या अनेक सहकाऱ्यांना, तिच्या कंपनीच्या वकील रिता नगबीर यांनाही या लोकांनी ताब्यात घेतलं आहे.

7/17

ओस्वाल कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने केलेल्या खोट्या आरोपांखाली माझ्या मुलीला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप पंकज यांनी केला आहे. या कर्मचाऱ्याने कंपनीमधील मौल्यवान वस्तू चोरण्याबरोबरच ओस्वाल कुटुंबाला गॅरेंटर ठेऊन 2 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे 1 कोटी 68 लाखांचं कर्ज घेतलं होतं, असं पंकज यांचं म्हणणं आहे.

 

8/17

पंकज यांनी संयुक्त राष्ट्राअंतर्गत अशाप्रकारे अचानक ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची प्रकरण हाताळणाऱ्या तुकडीलाही पत्र लिहिलं असून या प्रकरणात लक्ष घालून मुलीची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे.

9/17

राधिका यांनी युगांडा सरकारसाठी एक भावनिक पत्रक जारी केलं आहे. मला माझ्या मुलीशी बोलू दिलं जावं अशी त्यांची मागणी केली आहे. "प्रत्येक आईचं हे सर्वात वाईट स्वप्न असावं असा प्रकार आहे. माझ्या मुलीला परदेशातील तुरुंगात टाकण्यात आलं आहे. तिला तिचे मूलभूत अधिकारही वापरु दिले जात नाहीयेत. वसुंधराचा यामध्ये काहीच सहभाग नाही. मला ती सुरक्षित परत माझ्या मिठी हवी आहे," असं राधिका यांनी म्हटलं आहे.

10/17

वसुंधराचे हाल होत असल्याचा दावा ओस्वाल कुटुंबाने केला आहे. ती शाकाहारी असूनही तिला शाकाहारी भोजन दिलं जात नाही. कोणतीही नोटीस न देता तिला एका तरुंगातून दुसऱ्या तुरुंगात अचानक हलवलं जातं. 

11/17

वसुंधरा एकदा तर तब्बल 90 तास चप्पला असलेल्या खोलीत ठेवण्यात आलं. तिला वापरण्यासाठी देण्यात आलेलं टॉयलेटही फार अस्वच्छ असल्याचं, ओस्वाल कुटुंबाने तिच्याच इस्टाग्रामवरुन पोस्ट केलं आहे.

12/17

ओस्वाल कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपींनंतर वसुंधराला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र यामध्ये वसुंधरावर करण्यात आलेले आरोप चुकीचे, बिनबुडाचे असल्याचं तिचे वडील पंकज यांचं म्हणणं आहे. हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आले असून आमच्या नामांकित उद्योजक कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हा सारा प्रकार केला जात असल्याचं पंकज ओस्वाल यांचं म्हणणं आहे.

13/17

वसुंधराने स्वित्झर्लंड विद्यापीठामधून बॅचलर्स ऑफ फायनान्सची पदवी घेतली आहे. याच शिक्षणाचा वापर करुन ती तिच्या कौटुंबिक उद्योगामध्ये सक्रीय झाली.

14/17

वसुंधरा सध्या अॅक्सिस मिनरल्सची कार्यकारी निर्देशक आहे. आपला उद्योग समूह पर्यावरणस्नेही असावा यासाठी वसुंधराचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. तिने यासंदर्भात बरेच बदल केले असून त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

15/17

महिन्यातील 15 दिवसांहून अधिक काळ वसुंधरा ही वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी देत असते. यामध्ये अगदी बांधकामाच्या ठिकाणीही ती पाहणी करताना दिसून येतं. सरकारी स्तरावरील सर्व पूर्तता कंपन्यांनी केली आहे की नाही, आर्थिक बाबींची घडी नीट बसवण्याकडे वसुंधराचं विशेष लक्ष असतं असं सांगितलं जात आहे.

16/17

काही महिन्यांपूर्वीच पंकज आणि राधिका ओस्वाल यांनी स्वित्झर्लंडमध्ये 4.3 लाख स्वेअर फुटांचा व्हिला व्हेरी नावाचं आलिशान घर 200 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा विकत घेतलं. ही किंमत भारतीय चलनानुसार 1649 कोटी रुपये इतकी होते. ओस्वाल कुटुंबाची एकूण संपत्ती 247000 कोटी इतकी आहे आहे.

17/17

पंकज आणि राधिका यांची वसुंधारा ही पहिली कन्या असून त्यांना एकूण तीन दांपत्य आहेत. वसुंधराचा थोरला भाऊ अभय कुमार ओस्वाल हा उद्योग समुहातील शेतीसंदर्भातील उद्योगांचं नेतृत्व करतो. तर वसुंधाराची धाकटी बहीण रिधी ही लंडनमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे.





Read More