चित्र गौरव पुरस्कार 2025' च्या 25 व्या वर्षीचे होस्ट होते. यावर्षीचा पुरस्कार सोहळा काही अनोखाचं साजरी झाला. पाहूयात कोणकोणते कलाका...
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी चित्र गौरव 2025' गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, झी गौरव पुरस्काराच्या 25 वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
झी चित्र गौरव पुरस्कार 2025 च्या रेड कार्पेटवर मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या दिग्गज कलाकारांनी अशोक सराफ, निवेदिता, सुप्रिया आणि सचिन पिळगावकर, शुभांगी गोखले, महेश मांजरेकर, भरत जाधव, महेश कोठारे हे आणि इतर दिगज्जांनी ह्या कार्यक्रमाला चारचाँद लावले. रेड कार्पेटवर त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता आणि शोभा वाढवत होती.
त्याचसोबत अक्षया देवधर, शरयू सोनवणे, वल्लरी विराज, पूर्वा कौशिक आणि प्राप्ती रेडकर या झी मराठीच्या नायिकांनी श्रेयस तळपदेसोबत मराठी चित्रपटसृष्टीला ट्रिब्यूट दिले. मराठी चित्रसृष्टीच्या न संपणाऱ्या वारशाची सर्वांना आठवण करून देणारा हा हृदयस्पर्शी क्षण होता.
रितेश देशमुख आणि अमेय वाघ या प्रतिभावान आणि करिश्माई जोडीने ह्यावर्षीच 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सुत्रसंचालन केले. त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या दोघांची धमाल आणि ऊर्जा हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होते, ज्यामुळे उपस्थित सर्वांसाठी हा एक मनोरंजक आणि अविस्मरणीय अनुभव होता.
झी चित्र गौरवचं रेड कार्पेट म्हणजे ग्लॅमर. प्राजक्ता माळी, वैदेही परशुरामी, प्रार्थना बेहरे, प्रियदर्शनी इंदलकर, अमृता सुभाष, अनुष्का दांडेकर, हर्षदा खानविलकर, भूषण प्रधान, आदिनाथ कोठारे आणि इतर अनेक ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वांचा समावेशने रेड कार्पेट जगमगले होते.
यंदाचा 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' मराठी चित्रपटाचा खरा उत्सव होता, ज्याने अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालत असलेल्या मराठी सिनेसृष्टीची ग्लॅमर, प्रतिभा यांचा वारसा दर्शविला.
'झी चित्र गौरव 2025' पुरस्काराच्या अविस्मरणीय क्षणांचे आणि दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा. 8 मार्च रोजी संध्या. 7 वा. फक्त आपल्या झी मराठीवर.