PHOTOS

विराटची रिप्लेसमेंट सापडली? चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी 'या' खेळाडूने बिर्याणी सोडली, 10 किलो वजन कमी केलं अन्..

This 27 Year Old Likely To Replace Virat Kohli In Indian Test Team: विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार याबद्दल उत्सुकता असतानाच एक खेळाडू या जागी निवड व्हावी म्हणून कठोर परिश्रम करताना दिसतोय. त्यासाठी त्याने अगदी वजनही कमी केलं आहे. हा खेळाडू कोण आणि त्याच्या कामगिरीची आकडेवारी काय सांगते पाहूयात...

Advertisement
1/13

तो सध्या मैदानात आणि मैदानाबाहेर कसून सराव करतो केवळ संघात स्थान मिळावं म्हणून. हा खेळाडू आहे तरी कोण आणि त्याचा रेकॉर्ड कसा आहे पाहूयात सविस्तरपणे...

2/13

इंग्लंड दौऱ्यासाठी पुढील काही काळामध्ये भारताचा कसोटी संघ जाहीर होणार आहे. रोहित शर्मा, रविचंद्रन अश्वीन आणि विराट कोहली यांनी कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने आगामी कसोटी मालिकेमध्ये भारताचा कर्णधार कोण असणार इथपासून ते संघात कोणाला स्थान दिलं जाणार आणि कोणाला नाही याबद्दलची विशेष उत्सुकता कायम आहे.

3/13

रोहित शर्माची ओपनर म्हणून जागा कोण घेणार तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटची कमी कोण भरुन काढणार याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच एक खेळाडू विराटची जागा घेण्यासाठी कसून सराव करण्याबरोबरच आपलं वजन कमी करण्याचाही प्रयत्न करतोय. 

 

4/13

ज्या खेळाडूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, सरफराज खान! इंग्लंडच्या मालिकेसाठी आपली संघात निवड केली जावी म्हणून सरफराज मैदानात आणि मैदानाबाहेरही घाम गाळताना दिसतोय.

 

5/13

पाच कसोटी सामन्यांसाठीच्या संघात निवड होईल की नाही याची कल्पना सरफराजला नाही. मात्र 20 जूनपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी 18 खेळाडू निवडले जाणार आहेत. त्यापूर्वी भारताच्या अ संघाचे इंग्लंड लायन्सच्या संघाविरुद्ध दोन सामने होणार आहेत. 

 

6/13

सरफराजला ऑस्ट्रेलियन दौऱ्यात संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र त्याने या काळात 10 किलो वजन कमी केलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या 27 वर्षीय खेळाडूने 10 किलो वजन कमी केलं आहे. सध्या सरफराज डाएट फॉलो करत असून त्याने त्याची लाडकी बिर्याणीही सोडली आहे. तो केवळ भाज्या आणि चिकन खातो.

 

7/13

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वेळोवेळी सरफराजच्या वजनाबद्दल चिंता व्यक्त करताना त्याने वजन कमी केलं पाहिजे असं मत यापूर्वीही अनेकदा व्यक्त केलं आहे. आता सरफराजने हा सल्ला मनावर घेतल्याचं दिसत आहे.

 

8/13

फलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करण्यासाठीही सरफराज विशेष मेहनत घेत आहे. ऑफ स्टम्पच्याबाहेरील चेंडू खेळण्याचा सराव सरफराज करत आहे. दिवसातून दोन वेळा सरफराज फलंदाजीचा सराव करतो.

 

9/13

या दोन्ही वेळेत सरफराज चौथ्या स्टम्पवर टाकले जाणारे चेंडू कसे खेळून काढता येतील याचा सराव करतोय. त्याचे वडील नौशाद खान हेच त्याचा सराव घेतात. 

 

10/13

न्यूझीलंडविरुद्ध सरफराजने 150 धावांची खेळी बंगळुरुच्या मैदानात केली होती. मात्र पुढील दोन कसोटींमध्ये त्याला अपयश आल्याने त्यानंतर त्यांना कसोटीत संधीच मिळाली नाही. ऑस्ट्रेलियातील सरावादरम्यान सरफराजला दुखापत झाल्याने रणजी चषक 2024-25 च्या पर्वात जम्मू आणि काश्मीर, मेघालय, हरियाणा आणि विदर्भाविरुद्ध खेळता आलं नव्हतं.  

 

11/13

सरफराज आतापर्यंत 6 कसोटी सामने भारतासाठी खेळला असून त्याने 371 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 

 

12/13

रोहित आणि विराट निवृत्त झाल्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्यासाठी सरफराज आशावादी आहे.

 

13/13

सरफराजने घरगुती क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या असल्या तरी त्या तुलनेत त्याला अंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच म्हणावी तशी संधी निवड समितीने दिली नाही. त्यामुळे यंदा तरी निवड समिती त्याच्यावर विश्वास टाकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 





Read More