PHOTOS

PHOTOS : ट्रकला एकाचवेळी धडकली पाच वाहने, मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघाताचा थरार

Advertisement
1/7
PHOTOS : ट्रकला एकाचवेळी धडकली पाच वाहने, मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघाताचा थरार
PHOTOS : ट्रकला एकाचवेळी धडकली पाच वाहने, मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघाताचा थरार

 मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 

2/7

रविवारी मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला होता या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा याच महामार्गावर अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

3/7

नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला आहे. मालवाहतूक ट्रकला, बस व पाठीमागून येणाऱ्या एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. 

4/7

पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघाता तीन जण जागीच मृत्यू झाले असून जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले  

5/7

अपघात इतका भीषण होता की यात अपघातग्रस्त वाहनांचा अक्षरशः चक्कनाचुर झाला आहे. बसच्या काचा तुटल्या आहेत.

6/7

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

7/7

अपघातामुळं मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.





Read More