महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिंद्रा थारवर मिळतेय इतक्या लाखांची सूट.
5 डोअर Mahindra Thar Roxx बाजारात आल्यानंतर थ्री डोअर थारवर प्रचंड सूट मिळत आहे.
5 डोअर थार आल्यानंतर 3 डोअर महिंद्रा थारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये मोठी घसरण झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये एसयूव्हीवर 1.60 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत होती. पण आता या कारवर 3 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.
सवलत देखील डीलरच्या स्टॉकवर अवलंबून असते. मात्र, या एसयूव्हीच्या थार अर्थ एडिशनवर सर्वाधिक सवलत मिळत आहे.
या एसयूव्हीची किंमत 11.35 लाख ते 17.60 लाखांपर्यंत आहे. तर अर्थ एडिशनची किंमत 15.40 लाख ते 17.60 लाख रुपयांपर्यंत आहे. या सर्व किंमती एक्स -शोरुम आहेत.
या किंमतीमध्ये ही एसयूव्ही फोर्स गुरखा आणि मारुती सुझुकी जिम्नीला टक्कर देते.