PHOTOS

IPL 2025 मॅच दरम्यान बॉम्ब हल्ला? Operation Sindoor नंतर 2 दिवसात 3 धमक्या, स्टेडियमवर धोक्याची घंटा

IPL 2025 Indian Cricket Stadium Bomb Threat:  पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केली.  या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. मात्र आता मागील दोन दिवसात आयपीएल 2025 दरम्यान तीन स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Advertisement
1/7

7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं गेलं. यानंतर आयपीएल 2025 चे सामने होणाऱ्या भारतातील तीन स्टेडियमला पाकिस्तानकडून बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

2/7

कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर बुधवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनला  ईडन गार्डन स्टेडियम बॉम्बने उडवण्यात येईल असा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. यानंतर स्टेडियमच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.  

3/7

गुरुवारी गुजरात क्रिकेट बोर्डाला सुद्धा अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवण्यात येईल अशा धमकीचा ईमेल आला होता. हा ईमेल पाकिस्तानच्या नावाने आलेला होता. या स्टेडियमवर आयपीएल 2025 चे अजून बरेच सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे गुजरात पोलीस सतर्क झाले असून स्टेडियमची सुरक्षा वाढवली आहे. 

4/7

गुरुवारी राजस्थानच्या जयपूर येथील सवाई मान सिंह स्टेडियमला सुद्धा बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली. जयपुर क्रिकेट असोसिएशनला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. त्यात लिहिले गेले की, 'अगर हो सके तो सबको बचा लो'. 

5/7

क्रिकेट स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यावर सुरक्षा एजन्सीने याबाबत चौकशी आणि तपास करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पाकिस्तानने भारताच्या 15 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो भारताने उधळून लावला.

6/7

पाकिस्तानने 8 मे रोजी केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. 

7/7

लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय.  मात्र भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. 





Read More