Mumbai Indians Eliminator Match : आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2025 मध्ये सुद्धा विजेतेपदाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. आता 30 मे रोजी शुक्रवारी त्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. परंतु या सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का बसला असून 3 परदेशी खेळाडूंनी संघाची साथ सोडली आहे. तेव्हा गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
आयपीएल 2025 मध्ये सोमवारी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात त्यांना पंजाब किंग्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर पोहोचली तर मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या स्थानीच राहिली.
आता मुंबई इंडियन्सला फायनलच्या आणखीन जवळ पोहोचण्यासाठी 30 मे रोजी शुक्रवारी गुजरात विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडणार असून यात विजयी होणारा संघ अहमदाबाद येथे होणारा क्वालिफायर 2 सामना खेळेल.
मात्र एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का बसला असून 3 परदेशी खेळाडूंनी संघाची साथ सोडली आहे. यात विल जॅक्स, रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमिटमेंटसाठी मायदेशी परतले आहेत.
विल जॅक्स हा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत इंग्लंड संघाचा भाग आहे. तर रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश हे दोघे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये साऊथ आफ्रिका संघाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडून मायदेशाची वाट धरली.
विल जॅक्स, रायन रिकेलटन आणि कॉर्बिन बॉश हे तिघे आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग होते. त्यांच्या जागी मुंबईने जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांना संघात संधी दिली आहे.
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना रोहित शर्मासोबत जॉनी बेअरस्टो डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11 मध्ये तीन आघाडीचे वेगवान गोलंदाजांचा एलिमिनेटर सामन्यात समावेश करू शकतो. यात ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असेल. चरिथ असलंका याला प्लेईंग 11 मध्ये मिडल ऑर्डरमध्ये संधी दिली जाऊ शकते.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, जेएम बेअरस्टो (विकेटकीपर), एसए यादव, तिलक वर्मा, सी असलंका, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, जेजे बुमराह, ट्रेंट बोल्ट, डीएल चहर (बेंच खेळाडू : आरडी रिकेल्टन, केएल श्रीजीथ, रॉबिन मिन्झ, बी जेकब्स, डब्ल्यूजी जॅक्स, राज अंगद बावा, अर्जुन तेंडुलकर, विघ्नेश)