चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे डिप्रेशन आणि नैराश्याचा सामना करत आहेत. त्यातील अनेकांनी डिप्रेशनवर मात करत नवीन आयुष्य सुरू केले आहे.
आज आम्ही तुम्हाला एका लोकप्रिय गायकाबद्दल सांगणार आहोत. ज्याने डिप्रेशनवर मात करत स्वतःला सांभाळले आणि यातून बाहेर पडला.
आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, तो एक चित्रपट पाहून डिप्रेशनचा शिकार झाला होता. ज्यामुळं त्याने ओव्हरडोज घेतला होता. तेव्हा डॉक्टरने त्याला एक अजब सल्ला दिला होता.
हा गायक आज भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय आहे. त्याची गाणे आज खूप लोकप्रिय आहेत. या गायकाने त्याच्या करिअरची सुरुवात 2006 साली केली होती. आता त्याला इंडस्ट्रीत 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आम्ही बादशहाबद्दल बोलत आहोत. गायक बादशहा त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बादशहाच्या आयुष्यातही एक अशी वेळ आली होती जेव्हा तो डिप्रेशनचा शिकार झाला होता. त्याने मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मी लुटेरा चित्रपट बघितला आणि मला डिप्रेशनचा सामना करावा लागला. मला नैराश्य जाणवायला लागले. मला एंग्जायटी अटॅक यायला लागले. त्यानंतक मी औषधांचा ओव्हरडोस घेतला आणि लगेचच डॉक्टरला फोन केला.
मी डॉक्टरला फोन करुन सांगितले की, मी लुटेरा बघितल्यानंतर खूप अस्वस्थ झालो होते. तेव्हा त्याने मला सांगितले की, भावा तु रांझणा अजिबात बघू नकोस. बादशाहने सांगितले की, मी आता माझं मानसिक स्वास्थ चांगले सांभाळले आहेत. एक वेळ होती त्यानंतर मी कधीच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतलं नाही.
मला तेव्हा पॅनिक अटॅक यायचे. मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा मला एंग्जायटी वाटत होती. विमानात मला भीती वाटत होती आणि मला घाम येऊ लागला होता. तेव्हा मी गाणं लिहायला घेतलं त्यानंतर मला भिती वाटायला लागली.
बादशहाने म्हटलं की, या सगळ्यांमुळं मी खूप वैतागलो होतो. तेव्हा मी माझ्या बहिणीकडे मदत मागितली. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सांगितले की डिप्रेशन, एंग्जायटी आणि डिसऑर्डर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 6 महिने लागले होते.