Yogasana To Relief From Stress: तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामही गरजेचा आहे. फिजिकल फिटनेस योग्य असेल तर मेंटल फिटनेसही चांगली राहते. पण अनेकदा आपण आपल्याच कामात इतके गढून जातो की ताण-तणान खूप वाढत जातो. त्यामुळं डोकं शांत ठेवण्यासाठी हे चार योगासने करा.
आजकालच्या बिझी लाइफस्टाइल आणि वर्क प्रेशरमुळं डोकं शांत आणि रिलॅक्स असणे गरजेचे आहे. डोकं शांत नसेल तर कामात मन लागणार नाही. डोकं शांत ठेवण्यासाठी व मन एकाग्र करण्यासाठी योगासने खूप फायदेशीर ठरतात.
योगासने हा मानसिक ताण-तणाव हलका करण्याचा खूप प्रभावी उपाय आहे. दररोज न चुकता योगासने केल्यामुळं प्रोडक्टिव्हिटी वाढते. तसंच, मेंदूचे आरोग्य उत्तम असेल तर अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला काही अशी योगासने सांगणार आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी होणार आहे.
अनुलोम-विलोम हा प्राणायमाचा प्रकार आहे. मात्र त्याला नाडीशोधन प्राणायम असेही म्हणतात. अनुलोम-विलोम करताना उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन डाव्या नाकपुडीतून श्वास सोडणे. असे साधारण 5-7 मिनिटे करावे. यामुळं मानसिक ताण-तणाव कमी होतो. श्वासोच्छावास आणि रक्ताभिसरण सुरळीत होते.
ओंकार साधना करताना ओमचा जाप करुन ध्यान केले जाते. ही योगक्रिया डोकं शांत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. या योगसाधनेमुळं मन हलके होते. ओंकार साधना करताना एका जागी बसून करु शकता. अ, उ आणि म असे दोन स्वर आणि एक व्यंजन आहेत. तोंड उघडे ठेवून अचा उच्चार आणि तोंड मिटत असताना उचा उच्चार होतो. एक ओंकार साधारण दहा सेंकदात म्हटला जायला हवे. रोज 15 ते 20 मिनिटे ओंकार जप करायला हवा.
मानसिक शांतीसाठी भुजंगासन करावे. याचे अनेक फायदे आहेत. पोटाची चरबी वितळवण्याव्यतिरिक्त मानसिक स्वास्थ राखण्यासही मदत करतात. भुजंगासन करताना, सर्वातपहिले जमिनीवर मॅट अंथरुन त्यावर पोटावर झोपावे. नंतर दोन्ही तळवे जमिनीवर टेकवावा. आता तुमच्या शरीराचे वजन तुमच्या तळव्यांवर टाका. श्वास आतमध्ये घ्या आणि डोक वर घेऊन पाठीच्या दिशेने उचला. लक्षात घ्या की हे आसन करताना हाताचे कोपर वाकले नाही पाहिजेत. या स्थितीत 15 ते 30 सेकंद राहा.
सेतुबंधासन शरीराबरोबरच डोकंही शांत ठेवते. या योगासनाची सुरुवात केल्यानंतर तुमचा दिवसभर खूप अॅक्टिव्ह राहाल. सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच रहावेत. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा.
योगासनांची सुरुवात करताना एखाद्या तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच आसने करा. जर तुम्हाला एखादा आजार आहे तर योज विशेषज्ञांची मदत घ्या आणि मगच योगासने करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)