बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाला आज 41 वर्ष पुर्ण झाले आहेत. या खास दिनानिमित्त अनिल कपूर यांनी एक अत्यंत भावनिक आणि प्रेमळ पोस्ट शेअर करून आपल्या सहजीवनातील आठवणी जागवल्या आहेत. पाहूयात त्यांचे हे खास क्षण.
Anil Kapoor Wedding Anniversary: अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर 10 खास फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये आपल्या आयुष्यात सुनीता कपूरचे स्थान किती मोठं आहे हे स्पष्ट केलं होईल. त्यांनी फोटो पोस्ट करताना खाली एक सुंदर नोट देखील लिहीली आहे.
अनिल आणि सुनीता यांची ओळख एका फोन कॉलवरून झाली होती. त्या काळात अनिल कपूर बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी स्ट्रगल करत होते. तर सुनीता एक प्रसिद्ध मॉडेल होत्या. त्यांच्या मैत्रीची सुरुवात प्रेमात कधी झाली हे कळलंच नाही. तब्बल 12 वर्षे डेटिंगनंतर त्यांनी 1984 मध्ये लग्न केले. त्या वेळेस अनिल कपूर यांचे करिअर नुकतेच आकार घेत होते. पण सुनीता यांनी त्यांच्या स्वप्नांचा आदर करत त्यांना नेहमी साथ दिली.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनिल कपूर यांनी लिहिले, 'आमच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण झाली, पण आपण एकमेकांसोबत 53 वर्षांपासून आहोत. एकही दिवस असा गेला नाही की मला तुझ्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी कृतज्ञता वाटली नाही. तू माझी पत्नी नव्हतीस फक्त, तर माझा खंबीर आधार आहेस.'
'तू माझ्या आयुष्यात प्रत्येक चांगल्या आणि कठीणक्षणी माझ्या पाठीशी उभी होतीस. माझ्या आईवरही तू जसे प्रेम केलेस आणि काळजी घेतलीस, त्याबद्दल मी तुझा कायम ऋणी आहे.'
अनिल कपूर यांच्या या भावनिक पोस्टमध्ये त्यांची दिवंगत आई निर्मल कपूर यांचाही उल्लेख होता. त्यांनी म्हटले की, 'माझी आई आज आपल्यासोबत असती, तर ती आपल्याला आजच्या दिवशी शुभेच्छा द्यायला विसरली नसती. पण मी खात्रीने सांगतो की ती जिथे कुठे आहे, तिला आपल्यावर आणि आपल्या नात्यावर नक्कीच अभिमान आहे.'
अनिल कपूर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले, 'तू माझी पत्नी, माझी मैत्रीण, माझ्या आयुष्यातील सखी आहेस. आपला सहप्रवास अद्वितीय आहे. आपण किती काही अनुभवले, त्यात प्रेम, संघर्ष, यश, आनंद, दुःख... पण तू कायम माझ्यासोबत होतीस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे सोनू. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!'
अनिल कपूर यांची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या या सुंदर नात्याला शुभेच्छा दिल्या. फराह खान, चंकी पांडे, सोनम कपूर, संजय कपूर यांसारख्या कलाकारांनी कमेंट्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.
अनिल आणि सुनीता कपूर हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रेरणादायी जोडप्यांपैकी एक मानलं जातं. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी नेहमी एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि बांधिलकी जपून ठेवली आहे. त्यांच्या प्रेमकहाणीला आणि नात्याला अनेक चाहत्यांनी 'टाइमलेस' आणि 'परिपूर्ण' असं म्हटलं आहे.
अनिल कपूर यांच्या पोस्टमधून फक्त एक सेलिब्रिटी जोडीदार म्हणून नव्हे, तर एक प्रेमळ नवरा, जबाबदार मुलगा आणि भावनिक व्यक्ती म्हणून त्यांचा चेहरा समोर आला आहे. ही पोस्ट म्हणजे त्यांच्या वैवाहिक नात्याची एक सुंदर झलक आहे, जी अनेकांसाठी आदर्श ठरू शकते.
Photo Credit: Social Media