PHOTOS

त्या रात्री शेफालीच्या नाडीचे ठोके सुरु होते पण ती...; मैत्रिणीने सांगितला 27 जूनच्या रात्रीचा घटनाक्रम

Shefali Jariwala Death: शेफालीच्या मृत्यूनंतर धक्कादायक माहिती समोर येत असतानाच आता तिच्या मैत्रिणीने त्या रात्री काय झालं याचा तपशील दिलाय. ती काय म्हणालीये पाहूयात...

Advertisement
1/9

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तपासादरम्यान एकामागून एक खुलासे होत आहेत. अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की ती अँटी एजिंग औषध घेत होती आणि याच औषधामुळे तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात, शेफालीची जवळची मैत्रीण पूजा घईने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत मैत्रिणीच्या मृत्यूच्या दिवशी काय घडले ते सांगितले आहे. ती खरोखरच वयाची वाढ रोखणारी औषधं घेत होती का? याबद्दल ती काय म्हणालीये पाहूयात...

 

2/9

विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत शेफाली जरीवालाची मैत्रीण पूजा घईने शेफालीचा मृत्यू झाला त्या रात्री काय घडले हे सांगितले आहे. पूजाने त्या रात्री नेमके काय घडले याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

 

3/9

पूजा म्हणाली की त्या दिवशी घरी सत्यनारायण पूजा होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा ती शेफालीची शेवटची राईड होती. सत्यनारायण पूजेसाठी संपूर्ण घर सजवण्यात आले होते. मी घरी पूजेसाठी सर्व तयारी करुन ठेवली होती.

 

4/9

पूजा म्हणाली की, 'शेफालीने दररोजप्रमाणे जेवण केले आणि परागला कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्यास सांगितले.' तो खाली येताच घरातील हेल्परने लगेच त्याला फोन केला आणि सांगितले की दीदीची म्हणजेच शेफालीची तब्येत ठीक नाही. तुम्ही लवकर घरी या असंही तो हेल्पर म्हणाला." 

5/9

"त्यांचा कुत्रा बराच म्हातारा झाला आहे. म्हणून परागने हेल्परला खाली येण्यास सांगितले. पराग नंतर लिफ्ट खाली येण्याची वाट पाहत होता. त्याचा हेल्पर खाली येताच कुत्रा त्याच्याकडे सोपवत पराग लगेच वरच्या मजल्यावर गेला. पराग म्हणाला की नाडी सुरु आहे पण ती डोळे उघडत नाहीये. शरीराचे वजन वाढत असल्यासारखे वाटत होते. म्हणून त्याला वाटले की काहीतरी गडबड आहे. यानंतर तो ताबडतोब तिला रुग्णालयात घेऊन गेला. तो तिला बेलेव्ह्यूला घेऊन गेला पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता," असं पूजा म्हणाली.

 

6/9

अँटी एजिंग औषधांबद्दल बोलताना पूजाने, 'मला वाटते की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणे चुकीचे आहे. मी दुबईमध्ये राहते हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. मी आता अभिनय करत नाही. म्हणून मला अशा औषधांची गरज नाहीये. पण, मला वाटतंय की अशी औषधं घेणं हे सगळेच स्वीकारतात. ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. तुम्ही दुबईत पाहिले तर तुम्हाला क्लिनिक आणि सलूनमध्ये अनेक व्हिटॅमिन सी ड्रिप दिसतील," असं म्हटलं.

7/9

"ती (शेफाली) अशा व्यवसायात होती की तिला तिथे सुंदर दिसणे फार आवश्यक होते. ती खूप सुंदर दिसायची. जेव्हा तिचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी घरी आणलं तेव्हा तिला पाहून माझं मन व्यथित झाला. हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. मला याबद्दल फार असुरक्षित वाटत नाही. त्या दिवशीची वेळ फक्त वाईट वेळ होती," असं मत पूजाने व्यक्त केलं. 

 

8/9

पूजा दुबईमध्ये राहते पण ती काही कारणानिमित्त मुंबईत आली आहे. याच कारणामुळे ती तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच शेफालीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली.

 

9/9

शेफालीने मृत्यूच्या दिवशी व्हिटॅमिन सी ड्रिप घेतला होता का? असा प्रश्न पूजाला विचारण्यात आला. याबद्दल बोलताना पूजाने, "मला वाटतं कोविडनंतर लोकांनी शक्य तितके व्हिटॅमिन सी घेण्यास सुरुवात केली. मी पण घेते. काही लोक गोळ्या घेतात आणि काही लोक आयव्ही ड्रिपद्वारे व्हिटॅमिन सी घेतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर, हो तिने त्या दिवशीही आयव्ही ड्रिप घेतला होता," असं सांगितलं. 





Read More