बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि धाडसामुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र, एक अभिनेत्री अशी आहे जिला बोल्ड क्वीन म्हणून ओळखले जाते. कोण आहे ती अभिनेत्री?
अनेक अभिनेत्रींनी अशा आहेत, ज्यांना बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रत्येक अभिनेत्रीने संघर्ष करून बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी एकेकाळी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. मात्र, नंतर तिचे नशीब बदलले आणि ती बॉलिवूडची बोल्ड क्वीन बनली.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचे नाव मल्लिका शेरावत आहे. अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही एअर होस्टेस म्हणून केली होती.
त्यानंतर अभिनेत्रीने गुप्तपणे एका पायलटशी लग्न केलं. त्यानंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. तिच्या ग्लॅमरस अंदाजाने बॉलिवूडमध्ये सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
अभिनेत्री मल्लिका शेरावतचे खरे नाव हे रीमा लांबा आहे. तिने पायलट करण सिंग गिलशी गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने तिचे लग्न सर्वांपासून लपवून ठेवलं.
कारण तिच्या मते लग्न झाल्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम होईल. परंतु, अभिनेत्रीने 4 वर्षांनंतर करण सिंगसोबत घटस्फोट घेतला आणि चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले.
अभिनेत्रीने 'मर्डर'सारख्या चित्रपटातून बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली. त्यानंतर तिला बोल्ड ब्युटीचा टॅग मिळाला. चित्रपटासोबतच तिने जाहिरातीमधून देखील संपत्ती कमावली आहे. तिची एकूण संपत्ती 172 कोटी रुपये आहे.