PHOTOS

कोणी हॉटेलच्या खोलीत पकडलं गेलं तर कोणी घरात घुसून केला कांड, बलात्काराच्या केसमध्ये फसलेत 5 दिग्गज क्रिकेटर

Cricketers Who Accused Of Rape Case : आयपीएल (IPL) च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्यावर पाच वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. इतकंच नव्हे तर ही तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली आहे. परंतु बलात्काराचे आरोप झालेला यश दयाल हा काही पहिलाच गोलंदाज नाहीये. यापूर्वी सुद्धा 5 दिग्गज क्रिकेटर्सवर असे आरोप लावण्यात आलेत. 

Advertisement
1/8

गाझियाबादमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर यश दयालबाबत तक्रार दाखल केली आहे. इंदिरापूरम सर्कल ऑफिसरकडे याची अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, पीडितेने 14 जून 2025 रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक 181 वरही या प्रकरणी संपर्क साधला होता अशी माहिती आहे. मात्र त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यातून पुढील कारवाई झाली नव्हती, असंही तिने सांगितलं आहे. 

2/8

एफआयआरमध्ये पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तिने यशविरोधात व्हिडिओ कॉल्स, चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि फोटो यासारखे पुरावे सादर केले आहेत.

3/8

पीडित  महिला म्हणाली की, 'त्याने मला आपल्या कुटुंबाशी भेटवलं, पतीसारखं वागलं आणि यामुळे मला विश्वास बसला. मात्र जेव्हा मला त्याच्या खोटेपणाची जाणीव झाली आणि मी विरोध केला, तेव्हा त्याने माझ्यावर हात उगारला. याशिवाय त्याने माझा  मानसिक छळही केला. या नात्यात मी केवळ भावनिकच नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप त्रासली होते'.

4/8
संदीप लामिछाने (नेपाल)
संदीप लामिछाने (नेपाल)

2022 मध्ये नेपाळचा युवा लेग स्पिनर संदीप लामिछानेवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप लावण्यात आला होता. या आरोपानंतर संदीपला नेपाळच्या क्रिकेट संघातून सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि नेपाळमध्ये परतल्यावर त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला. काहीकाळ त्याला क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं होतं. सध्या त्याच्यावरील हा खटला संपला आहे.

5/8
अमित मिश्रा (भारत)
अमित मिश्रा (भारत)

भारताचा माजी क्रिकेटर अमित मिश्रावर हॉटेलच्या खोलीत एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आले. बंगळुरू पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक सुद्धा केली होती. अमित मिश्रावर दंड संहितेच्या कलम ३५४ आणि 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर ही केस दाबण्यात आली. 

6/8
दानुष्का गुणाथिलका (श्रीलंका)
दानुष्का गुणाथिलका (श्रीलंका)

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्का गुणाथिलकाला टी 20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान सिडनीमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गुणथिलकावर टिंडर डेटनंतर महिलेवर तिच्या घरी हल्ला केल्याचा आरोप होता. नंतर दानुष्का गुणाथिलका यात निर्दोष आढळला.

7/8
मखाया एनतिनी (साउथ अफ्रीका)
मखाया एनतिनी (साउथ अफ्रीका)

1999 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखाया एनतिनीवर बलात्काराचे आरोप लावण्यात आले आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेकडून खेळणारा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू मखाया एनतिनीने स्वतः निर्दोष असल्याचा दावा केला. नंतर त्याला निर्दोष सोडण्यात आले होते. 

8/8
रूबेल हुसैन (बांग्लादेश)
रूबेल हुसैन (बांग्लादेश)

2015 रोजी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसैनला अटक करण्यात आली होती. कारण त्याची पूर्व गर्लफ्रेंड आणि बांगलादेशी अभिनेत्री नाजनीन अख्तर हॅप्पीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र न्यायालयाने रूबेल हुसैनला आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं. या संपूर्ण प्रकरणात  रुबेल हुसैनचं म्हणणं होतं की, नाजनीन त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होती. तसेच तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिल्याचेही रूबेलने नाकारले होते. 





Read More