Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा
तुम्हाला डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होत असेल, तर त्यावर उपाय करण्यासाठी, दिवसभर भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.
डोकेदुखी थांबवण्यासाठी अनेकदा तुमची आजी अद्रकचा चहा पिण्याचा सल्ला देत असेल. अँटी-इंफ्लेमेटरी गुण रक्त धमनींचे इंफ्लेमेशन कमी करतात त्यामुळे हृदयाच्या वेदना कमी होतात.
जर डोकेदुखी असहाय्य होत असेल तर लवंग आणि आलं याचा वापर करावा. तसेच नारळाच्या तेलामध्ये लवंग टाकून मालिश केल्याने देखील डोकेदुखी कमी होते.
तुळशीचं पानं गुणकारी मानली जातात. पाणी गरम करून घेतल्यानंतर त्यात तुळशीचं पान टाका अन् पाणी प्या. त्यामुळे डोक्याला आराम मिळतो.
चहा किंवा कॉफी पिल्याने डोकेदुखीपासून सुटका मिळू शकते. चहा आणि कॉफीमुळे आराम मिळतो.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला डोकेदुखी अनेकदा जाणवते. त्यावेळी फळं खा. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खालल्याने डोकेदुखी कमी होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)