Avoid Food with Mango : उन्हाळा म्हटलं की या काळात आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात या फळांचे आगमन होत असते. आंब्याचा वापर चटणी, कॅरिचे पन्ह, आंब्याचे लोणचे, आंब्याचे काप यांसारख्या विविध चवदार पदार्थांमध्ये देखील केला जातो. आंबा खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही पदार्थांसोबत या फळाचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यदायी परिणाम होऊ शकतो.
आंबा खाल्ल्यानंतर थंड पेय पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, तसेच पोटात समस्या उद्भवू शकतात.
लोकांना बर्याचदा दही खायला आवडते आणि दह्याबरोबरच आंबा खाण्याची ही इच्छा होते. जर आंबा खात असाल तर पुन्हा अशी चुक करू नाका. त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
अनेकजण जेवताना पाणी पिणे टाळतात. तसेच आंबा फळ खाल्ल्यानंतरही पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण असे केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतात.
कोणतेही मसालेदार पदार्थ खात असाल तर चुकूनही आंब्याला हात लावू नाका. कारण असे केल्याने पोट खराब होऊ शकते.
लोकांना उन्हाळ्यात कारले खायला आवडतात. कारल्याची करी खाल्ल्यानंतर जेव्हा लोक आंबे खायला लागतात तेव्हा चिंता वाढते. असेच करत असाल तर आजपासून ते करणे बंद करा, कारण आंब्यासोबत कारले खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.