PHOTOS

Heart Friendly Foods: हृदयविकाराच्या आजारापासून वाचायचंय? मग 'हे' पाच पदार्थ खा

हृदयविकाराच्या घटना जास्त घडत असल्याचं समोर येत होतं. मात्र, आता तरुणांपासून ते लहान मुलांमध्येही हे प्रमाण वाढलं आहे. काय आहे ...

Advertisement
1/8

काही वर्षांपूर्वी वृद्ध लोकांना हृदयविकाराचा आजार झाल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. परंतु, आजकाल लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत या घटना ऐकायला येत आहेत. 

2/8

यामागचे कारण हे आपली बिघडणारी जीवनशैली असल्याच म्हटलं जात आहे. जर तुम्हाला देखील हृदयविकाराचा आजार होऊ नये असे वाटत असेल तर पुढील पाच पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

3/8

सर्व धान्यांमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर यासारखे अनेक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या हृदयाला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत असतात. 

4/8

तसेच ते रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. चांगले हृदय हवे असेल तर ब्रेड आणि पास्ता खाणे टाळा. 

5/8

सर्व फळांमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. यामध्ये जांभूळ, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि संत्री हे शरीरातील जळजळ आणि ऑक्सीडेटिव ताण कमी करण्यास मदत करते. 

6/8

नट्स आणि बीज हे दोन्ही चरबी, फायबर आणि वनस्पती स्टेरॉलने समृद्ध असतात. हे दोन्ही कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच ऑलिव तेल आणि एवोकाडोपासून हृदय अनुकूल राहते.  

7/8

तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि रक्तदाब कमी होतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. 

8/8

फैटी मासे म्हणजे ज्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ओमेगा-3 ऍसिडस् आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आणि ते विविध आरोग्यदायी फायदे देतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More