PHOTOS

India Most Expensive Cars: भारतातील या 5 आहेत सर्वात महागड्या कार, लक्झरी सुविधांसह मोठी सुरक्षा

Luxury Cars in India : भारतातील सर्वात महागड्या कार तुम्हाला माहित आहे का? देशातील या 5 सर्वात महागड्या कार असून अत्याधुनिक सुविधांसह यात सेफ्टी सुरक्षा कवच आहे.

Advertisement
1/5

भारतात धावणाऱ्या टॉप 5 सर्वात महागड्या वाहनांमध्ये शेवटचे स्थान 'रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज' ('Rolls Royce Cullinan Black Badge') आहे. हे वाहन हैदराबादचे व्यापारी नसीर खान चालवतात. या कारची किंमत सुमारे 8.20 कोटी रुपये आहे आणि ही भारतातील सर्वात महागडी एसयूव्ही आहे. नसीर खान व्यतिरिक्त उद्योगपती मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांच्याकडेही ही महागडी कार आहे. या कारमध्ये बसवलेले इंजिन 600 Bhp आणि 900 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.  

2/5

महागड्या कारमध्ये चौथे स्थान मर्सिडीजचे (Mercedes S600 Guard) आहे. या कारची किंमत 10 कोटींहून अधिक असून ती केवळ खास ऑर्डरवर बनवली जाते. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ही कार वापरतात. ही जगातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. आत बसलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. ही कार 2 मीटर अंतरावरुन 15 किलो टीएनटी स्फोट देखील सहन करु शकते. या कारचे बांधकाम स्पेशल स्टीलने करण्यात आले असून ती स्टीलच्या बुलेटलाचा सामना करु शकते. 

3/5

महागडी कार वापरणाऱ्याच्या यादीत तिसरे स्थान McLaren 765 LT Spider कारचे आहे. त्याची किंमत सुमारे 12 कोटी आहे. या अत्यंत महागड्या सुपरकारचे मालक नसीर खान हे हैदराबादचे व्यापारी आहेत. त्याच्याकडे लक्झरी आणि स्पोर्ट्स कारचा मोठा संग्रह आहे.  McLaren 765 LT स्पायडर कारबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण जगात आतापर्यंत या कारचे फक्त 765 युनिट्स बनवण्यात आले आहेत. 

4/5

महागड्या कारचा विचार केला तर अंबानी कुटुंब मागे कसे राहील. महागड्या वाहनांच्या यादीत दुसरे स्थान अंबानी कुटुंबाचे आहे. एवढेच नाही तर देशात धावणाऱ्या 5 सर्वात महागड्या वाहनांपैकी 2 कार फक्त अंबानी कुटुंबाकडे आहेत. त्यांच्याकडे 'The Rolls Royce Phantom Series VIII'  कार आहे. मुंबईतील या कारची मूळ किंमत 13.5 कोटी रुपये आहे. कारचे वेग 100 किमी/ताशी असून तो केवळ 5.4 सेकंदात गाठू शकते. 

5/5

भारतात सध्या विक्रीसाठी असलेली सर्वात महागडी कार Bentley Mulsanne EWB Centenary Edition आहे. या सुपर लक्झरी सेडानचे मालक व्ही.एस. रेड्डी आहेत. ते ब्रिटिश बायोलॉजिकलचे एमडी आहेत. त्यांनी ही कार बंगळुरुमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या कारची खास गोष्ट म्हणजे आजपर्यंत या ब्रँडची केवळ 100 वाहने कंपनीने बनवली आहेत. हे लक्झरी वाहन यॉट 6.75-लिटर V8 इंजिनला सपोर्ट करते.  त्याचा टॉप स्पीड 296 किमी/तास आहे. 





Read More