लवकरच व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सुकर आणि मजेशीर होणार आहे. संबंधित काही अपाडेट्स व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर तपासले जात आहेत.
वॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आता ऑडिओवरून व्हिडिओ कॉल स्विच करता येणार आहे. लवकरच हा पर्याय जगभरातील सार्या युजर्सना खुली होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच ग्रुप कॉलची सोय उपलब्ध केली जाणार आहे. सध्या केवळ वन टू वन कॉलची सोय आहे.
पूर्वी इंस्टाग्राम स्टोरीज फेसबुकवर शेअर करण्याची सोय होती. आता हा पर्याय व्हॉट्सअॅपसाठीही खुला करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनला नवे अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणता सदस्य संदेश पाठवेल? आयकॉन आणि डिस्क्रिप्शनमध्ये कोण बदल करेल ? या अधिकारांमध्ये बदल होणार आहे.
फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सअॅपवरही 'लाईक' चा इमॉटिकॉन पाठवता येणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर सुरू करण्यात आले आहे.