Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आताच पाहून घ्या तुम्हाला नेमकं कोणत्या मार्गानं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो....
Indian Railway : पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 56 तासांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेनवर रद्द
Indian Railway : रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सूरत यार्डमध्ये 26 ऑगस्ट 2023 ला सकाळी 9.30 वाजल्यापासून 28 ऑगस्ट 2023 पर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
नॉन इंटरलॉकिंग कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सूरत- उधना मार्गावरील लाईन 3 साठी हा ब्लॉक घेतला जाईल.
रेल्वेच्या तब्बल 56 तासांच्या या ब्लॉकचा थेट परिणाम पश्चिम रेल्वे वाहतुकीवर होणार असून, काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काहींच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
ट्रेन क्रमांक 22903 - वांद्रे टर्मिनस- भुज एसी एसएफ एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023), 12267 मुंबई सेंट्रल - हापा दुरंतो एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023), 22989 वांद्रे टर्मिनस - मधुवा एसएफ एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023), 22965 वांद्रे टर्मिनस - भगत की कोठी एसएफ एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023)
ट्रेन क्रमांक 22931 वांद्रे टर्मिनस- जैसलमेर एसएफ एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023), 09037 वांद्रे टर्मिनस - बारमेर स्पेशिअल एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023), 22209 मुंबई सेंट्रल - नवी दिल्ली दुरन्तो एक्स्प्रेस एक्स्प्रेस (25 ऑगस्ट 2023)
ट्रेन क्रमांक 12966 भुज- वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, 12990 अजमेर- दादर एक्स्प्रेस, 12980 जयपूर- वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, 02134 जबलपूर- वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (सर्व रेल्वेगाड्या 25 ऑगस्ट 2023 रोजीच्या आहेत.)