58 Year Old Actor Date 29 Year Old Girlfriend Photos: सोशल मीडियावर सध्या या दोघांचे फोटो चर्चेचा विषय ठरत असून हा जगप्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा या तरुणीमुळे चर्चेत आला आहे. हे दोघे आहेत तरी कोण आणि ही तरुणी नक्की करते तरी काय जाणून घेऊयात...
या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जगभरात चर्चेत आहेत. तुम्ही या अभिनेत्याला नक्कीच ओळखत असाल. पण या तरुणीचे सुंदर फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. हे जोडपं आहे तरी कोण पाहूयात...
फोटोमध्ये दिसणारी ही सुंदर तरुणी अवघ्या 29 वर्षांची असून सध्या जगभर तिची चर्चा आहे.
या तरुणीचा तिचा कथित प्रियकर 58 वर्षांचा आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
मात्र हे खरं असल्याची चर्चा सध्या जगभरात आहे. विशेष म्हणजे या तरुणीचं नाव ज्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे तो अभिनेता कदाचित तुम्हालाही चांगलाच ठाऊक असेल. हा अभिनेता एका गाजलेल्या शोमुळे तरुणाईच्या मानावर अधिकाराज्य करणारं एक कॅरेक्टर गाजवणारा आहे.
ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे डेव्हिड श्वीमर (David Schwimmer) असं आहे. आता डेव्हिडची दुसरी ओळख सांगायची झाली तर त्याने नावाजलेल्या फ्रेण्ड्स मालिकेमध्ये रॉसची भूमिका साकारली होती.
नुकताच डेव्हिड या 29 वर्षीय मिस्ट्री गर्लबरोबर अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये एकत्र दिसून आला. त्यानंतर तो या तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये आहेत.
ही तरुणी मेडिकलची विद्यार्थीनी आहे. तिचं नाव एलियाना जोल्कोस्काय (Eliana Jolkovsky) असं असल्याचं सांगितलं जात आहे. हे दोघेही ब्रेवर्ली हिस्ट येथील उच्चूभ्रूंच्या स्पॅगो रेस्तराँमध्ये एकत्र दिसून आले. दोघेही एका आलिशान कारमध्ये बसून निघून गेले.
इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील माहितीनुसार एलियाना ही नामांकित अशा युनिव्हर्सिटी ऑफ कॉलिफॉर्निया, लॉस एन्जलीसमधील विद्यार्थिनी आहे.
ज्युडियन आणि कोरियन वंशाची आहे. तसेच ती ज्यू लोकांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती आहे.
एलियानाचे इन्स्टाग्रामवर 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
एलियाना ती सोशल मीडियावर फार सक्रीय आहेत.
रुग्णालयातील काही फोटोही एलियानाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अनेक सोशल गॅदरिंग, मित्र-मैत्रिणींबरोबरची भटकंती आणि पार्ट्यांमधील फोटो एलियानाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहयला मिळतात.
सध्या एलियाना किंवा डेव्हिड या दोघांनीही या डेटिंगच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नसली तरी दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चाहत्यांना शंका आहे.
डेव्हिडने यापूर्वी एलिझाबेथ स्टीव्हन्स नावाच्या तरुणीला 'फ्रेण्ड्स'च्या एका मालिकेत रॉसची भूमिका बजावताना डेट केल्याची आठवण चाहत्यांनी करुन दिली आहे. या भागात रॉसला डेट करणारी तरुणी पॅलेंथोलॉजीच्या क्लासमध्ये त्याच्यासोबत असल्याचं दाखवण्यात आलेलं.
डेव्हिडने खऱ्या आयुष्यात ब्रिटीश कलाकार झोई बकमॅनबरोबर लग्न केलं होतं. हे लग्न सहा वर्ष टिकलं. दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगीही आहे.
डेव्हिडचं नाव टीना बार्टी, जीना ली, कार्ला अल्पोंट, माली अवितल आणि नतेली एम्बर्गिलीया यांच्याशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता एलियाना ही या अभिनेत्याबरोबर नाव जोडण्यात आलेली सातवी महिला आहे.