PHOTOS

जगातील 6 चॉकलेट सीटी: 'हे' देश आहेत चॉकलेटसाठी प्रसिद्ध

6 Chocolate Cities: चॉकलेट प्रत्येकालाच आवडते आणि बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेट उपलब्ध आहेत. चॉकलेटमुळे काही देशांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. या देशांमध्ये चॉकलेटची एक विशेष खासियत आहे, जी त्यांना जगभरात प्रसिद्ध करते. 

Advertisement
1/7
बेल्जियम
बेल्जियम

'बेल्जियम'ला चॉकलेटची राजधानी मानली जाते. बेल्जियन चॉकलेट हे त्याच्या वेगळ्या चवीमुळे प्रसिद्ध आहे आणि त्याची बनवण्याची पद्धतही रहस्यमय आहे. 'न्यूहॉस' आणि 'लिओनिडास' सारख्या ब्रँड्सना त्यांच्या निर्मितीत पॅलाइन्स आणि ट्रफल्ससाठी जागतिक मान्यता मिळाली आहे.

 

2/7
स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंड

'स्वित्झर्लंड'मधील स्विस चॉकलेट त्याच्या क्रिमी पोत आणि संतुलित गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. स्विस चॉकलेट निर्मितीमध्ये तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांचा वापर केला जातो, ज्यामुळे ते जगभरात लोकप्रिय आहे.

3/7
फ्रान्स
फ्रान्स

फ्रेंच चॉकलेट्सची शुद्धता आणि तीव्रतेवर लक्ष केंद्रित करतात. 'व्हॅलरोना' आणि 'ला मैसन डू चॉकलेट' सारखे ब्रँड फ्रान्समध्ये प्रसिद्ध आहेत. फ्रेंच चॉकलेटाची चव आणि गुणवत्ता अनोखी आहे, जी चॉकलेट प्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

4/7
व्हेनेझुएला
व्हेनेझुएला

'व्हेनेझुएला' हे कोको बीन्सचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. 'व्हेनेझुएला'च्या कोकोपासून तयार केलेल्या चॉकलेटची चव चॉकलेट प्रेमींना खूप आवडते. तिथे 'एल रे' ब्रँडच्या चॉकलेटची मागणी सर्वाधिक असते. येथील मिळणाऱ्या कोकोची गुणवत्ता उच्च मानली जाते.

5/7
इटली
इटली

'इटली'चे चॉकलेट जगभरात प्रसिद्ध आहे. 'फेरेरो रोचर' आणि 'वेंची' सारख्या इटालियन ब्रँड्सने इटालियन चॉकलेटला जागतिक स्तरावर नेले आहे. इटलीतील चॉकलेटमध्ये एक खास प्रकारची चव आणि उच्च गुणवत्ता असते, जी चॉकलेट प्रेमींच्या हृदयावर राज्य करते.

6/7
हर्षे
हर्षे

आपल्यापैकी अनेकांना 'हर्षे चॉकलेट्स' माहीत आहेत, पण 'हर्षे' हे अमेरिकेतील एक शहर आहे. या ब्रँडचे चॉकलेट्स जगभरात प्रसिद्ध आहेत. याच्या क्रिमी चवीमुळे हे चॉकलेट सर्वांना खूप आवडतात.

7/7

याप्रमाणेच आणखी अनेक ब्रँड्स आहेत जे चॉकलेट प्रेमींच्या मनावर राज्य करत आहेत. अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट उपलब्ध आहेत. प्रत्येक चॉकलेटची चव आणि गुणवत्ता एकमेकांपेक्षा वेगळी असते.





Read More