ज्याप्रमाणे लोक त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतात, तसेच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे अवयव नेहमी धुळीच्या, उन्हाच्या संपर्कात येतात.
काळेपणामुळे अनेकवेळा लोकांना कमीपणा सहन करावा लागतो. हा काळेपणा घालवण्यासाठी अनेक प्रकारचे क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. पण महागड्या क्रीम्स ऐवजी तुम्ही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही बोटांचा काळेपणा दूर करू शकता.
बोटांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रथम लिंबू अर्धे कापा आणि त्यात थोडी साखर घाला. त्यानंतर याने तुमच्या बोटांना हळूवारपणे मसाज करा. थोडा वेळ ठेवून हात धुवा. हे स्क्रब बोटांवरील डेड स्किन काढून टाकते.
हळदीतून मिळणारे पोषक तत्त्व त्वचेला चमकदार बनवतात. यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा बेसनमध्ये चिमुटभर हळद आणि थोडे दुध घालून पेस्ट तयार करा. हे मिश्रण बोटांवर लावून 10-15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा.
तुम्ही कोरफटीचा गर किंवा बाजारात मिळणारे जेल बोटांवर लावू शकता. 15 मिनिटे ठेवून नंतर थंड पाण्याने हात धुवा. कोरफड त्वचेला ओलावा देते आणि यामुळे त्वचेचा काळेपणा कमी व्हायला मदत होते.
त्वचेला चमकदार बनवण्यासाठी बटाट्याचा रस खुप फायदेशीर आहे. यासाठी एक बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. हा रस बोटांवर लावून 15-20 मिनिटे ठेऊन धुवून टाका. यामुळेही बोटांचा काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
हे मिश्रण बनवण्यासाठी थोड्या दूधात एक चमचा मध घाला आणि बोटांवर लावा. 15-20 मिनिट हे मिश्रण ठेवा आणि नंतर धुवा.
आपल्या घरात टोमॅटो तर अगदी सहज मिळतील. मग एक टोमॅटो घेऊन त्याचा रस काढून बोटांवर लावा. 15-20 मिनिटे ठेऊन थंड पाण्याने धुवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)