PHOTOS

महिला दिन 2025 साजरा करण्यासाठी 6 प्रेरणादायक चित्रपट; नक्की पाहा

Women's Day 2025: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असे काही चित्रपट जे आपण आपल्या कुटुंबासोबत नक्की पाहायला हवे. या महिला दिना निमित्त या यादीतील चित्रपट नक्की पाहा. 

Advertisement
1/7

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी महिलांच्या कार्याचा गौरव केला जातो. या खास दिवशी तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर काही प्रेरणादायक चित्रपट पाहू शकता. यादीतील चित्रपट तुमचं मनोरंजन तर करतीलच, पण तुम्हाला महिलांच्या सामर्थ्याची जाणीव देखील करून देतील.  

2/7
'मिसेस' (Mrs)
'मिसेस' (Mrs)

2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'मिसेस'चित्रपट मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' चा रिमेक आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा एका गृहिणीची भूमिका साकारते, जी पतीचा त्रास सहन करून घरकाम आणि स्वयंपाक करत आहे. हा चित्रपट घरगुती महिलांच्या संघर्षांवर प्रकाश टाकतो.  

 

3/7
'लापता लेडीज' (Lapata Ladies)
'लापता लेडीज' (Lapata Ladies)

2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'लापता लेडीज' हा किरण राव दिग्दर्शित विनोदी चित्रपट आहे. यामध्ये दोन महिलांच्या वेगळ्या जीवनशैलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग मिळालं आहे.  

 

4/7
'क्वीन' (Queen)
'क्वीन' (Queen)

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्वीन' चित्रपटाच्या कथेचा गाभा एक साध्या मुलीचा आहे, जी तिच्या तुटलेल्या लग्नावर मात करून एकट्याने प्रवास करण्याचा निर्णय घेते. या प्रवासादरम्यान ती स्वतःला शोधते आणि प्रेम करायला शिकते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.  

 

5/7
'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiyawadi)
'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiyawadi)

2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'गंगूबाई काठियावाडी' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपट आहे, ज्यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.  

 

6/7
'राझी' (Raazi)
'राझी' (Raazi)

2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'राझी' हा चित्रपट एका भारतीय गुप्तहेराची कहाणी आहे जी पाकिस्तानात जाऊन देशाच्या भल्यासाठी कार्य करते. विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.  

 

7/7
'हायवे' (Highway)
'हायवे' (Highway)

इम्तियाज अलीचा 'हायवे' चित्रपट एका तरुणीच्या स्वतःच्या शोधाच्या प्रवासावर आधारित आहे. आलिया भट्टने वीरा या पात्राची भूमिका साकारली आहे, जी अपहरण झाल्यानंतर स्वातंत्र्य आणि शक्ती मिळवते. या चित्रपटात चित्तथरारक दृश्ये आणि ए.आर. रहमान यांच्या संगीताचा अद्भुत अनुभव मिळतो.





Read More