जास्त विचार करणे किंवा मनावर ताण दिल्याने मानसिक आणि भावनात्मक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळं ओव्हरथिकिंग कसे थांबवाल? हे पाहूयात.
ओव्हरथिकिंगचा परिणाम नकळत आपल्या मनावर होऊ शकतो. छोट्यातील छोटी गोष्ट आपण नकळत मनाला लावून घेतो आणि त्याबाबत विचार करु लागतो. ज्यामुळं आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
जास्त विचार करणे थांबवण्यासाठी स्वतःशीच बोलत राहा. यामुळं तुमच्या विचारांबाबत तुम्ही अधिक स्पष्ट व्यक्त होता आणि तुमचं डोकं थंड ठेवू शकता. त्याचबरोबर तुमचा राग आणि तणावात राहिल्यामुळं ओव्हरथिकिंग केल्यास मानसिक अवस्था कमजोर होते.
ओव्हरथिकिंग थांबवण्यासाठी तुमच्या मनात उठणारे विचार तुम्ही एका डायरीत लिहित जा. यामुळं तुमच्या मनात उठणारे वादळ शांत होऊ शकते. त्याचबरोबर मन हलकं होईल. त्याचबरोबर लिहण्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या गोष्टीमुळं चिंतेत आहात आणि त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न कराल.
ओव्हरथिकिंग थांबवण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. मन शांत ठेवण्यासाठी व आपले विचार स्पष्ट होण्यासाठी व आपली एकाग्रता वाढवण्यासाठी स्वतःला जास्त विचार करण्यापासून योगा मदत करते.
तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीबाबत किंवा एखाद्या मुद्द्याबाबत तुमच्या परिवारासोबत किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत बोलू शकता. यामुळं तुमचं मन हलकं होईल. त्याचबरोबर तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला दुसरा मार्गदेखील सापडेल.
सतत काम आणि काम करत राहिलात तर त्याचा परिणाम मनावर होईल. त्यामुळं आराम करण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. त्यामुळं तुमचे विचार स्पष्ट होण्यास मदत होईल आणि तुम्ही निरोगी राहाल आणि नकारात्मक भावनांपासून स्वतःला वाचवाल.
मन शांत ठेवण्यासाठी तुमच्या आवडीचे काम करा. त्यामुळं तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त होण्यास मदत मिळेल. तुमचा छंद जोपासल्यास तुम्हाला काम करण्यास सकारात्मक उर्जा मिळेल आणि तुम्ही ओव्हरथिकिंग करण्यापासून स्वतःला थांबवाल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)