Kitchen Tips: प्रत्येक घरात दिवसभरातून एकदा तरी चहा केला जातो. अशावेळी उरलेली चहापावडर काय करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी खालील उपाय ठरतील फायदेशीर. चहा पावडरचा फक्त चहा बनवण्यासाठी वापर केला जातो. अनेकदा चहा पावडर झाडांना खत म्हणून वापरली जाते. चहा पावडर ही योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे इतर अनेक फायदे आहेत. या फायद्यांनी तुमच्या किचनमधील अनेक गोष्टी स्वच्छ होणार आहेत. एवढंच नव्हे तर फ्रिज देखील स्वच्छ होतो. असा करा वापर .
चहा पावडरचा वापर करण्याअगोदर पावडर योग्य पद्धतीने सुकवणे गरजेचे असते. अशावेळी चहा पावडर योग्य पद्धतीने गाळून तो एका प्लेटमध्ये सुकवू शकतो. वापरलेल्या चहा पावडरचा वापर करण्याअगोदर ती चांगल्या पद्धतीने सुकवणे गरजेचे आहे.
वापरलेली चहा पावडर योग्य पद्धतीने सुकवल्यावर ती स्टोअर करणे देखील तितकेच गरजेचे आहे. अशावेळी सुकलेली चहा पावडर एअर पॅक डब्यात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
अनेकदा फ्रिजमध्ये वेगवेगळे अन्न पदार्थ असल्यामुळे फ्रिजला वास येतो. अशावेळी वाटीत चहा पावडर काढल्यास त्यामुळे येणारा दुर्गंध कमी होतो.
अनेकदा मच्छी तळल्यावर किंवा वांग्याची कापे केल्यावर तवा तेलकट होतो. किंवा तलणीचे पदार्थ तळल्यावर भांड तेलकट राहतं. अशावेळी जास्तीचा साबण वापरुनही भांड्यांचा तेलकटपणा कमी होत नाही. अशावेळी त्या तेलकट भांड्याला वापरलेली चहा पावडर लावावी.
आपल्यापैकी वापरलेल्या चहा पावडरचा असा वापर करतही असाल. चहा पावडर झाडांना, छोट्या रोपट्यांना खत म्हणून वापरु शकता.
अनेकदा भरपूर स्वयंपाक झाला तर हातांना वास येतो. तसेच मांसाहार म्हणजे मच्छी, चिकन, मटण कापल्यास हाताला वास येत राहतो. अशावेळी तुम्ही हातांना सुकलेली चहा पावडर लावू शकता.
चॉपिंग बोर्डवर एखादा पदार्थ कापल्याने त्याचा रंग वेगळा होतो. किंवा त्या चॉपिंग बोर्डला देखील वास येत राहतो. अशावेळी तुम्ही वापरलेली चहा पावडर च्या चॉपिंग बोर्डला चोळू शकता.
काचेची भांडी कशी स्वच्छ करावी हा प्रश्न अनेकदा गृहिणींना पडतो. अशावेळी तुम्ही वापरलेल्या चहा पावडरने काचेच्या भांडी स्वच्छ करु शकता. यामुळे भांड्यांवर चरे पडत नाही.
पावसाळ्यात पाय अस्वच्छ होतात. माती किती केल्यास नखांमधून निघत नाही. अशावेळी पाय स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचं पाणी घेऊ शकता. कोमट पाणी टपात घेऊन त्यामध्ये वापरलेल्या चहा पावडरमध्ये पाणी टाकून ते उकळून घ्या. आणि या मिश्र पाण्यात पाय स्वच्छ करा.