PHOTOS

युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके

जुनी गाजलेली नाटकं जी आता पहायला मिळत नाहीत, त्यातली काही तुम्ही युट्यूबवर विनामूल्य पाहू शकता . नक्की कोणती आहेत ही नाटक ते जाणून घेऊया.काही खदखदवून हसवणारी नाटके युट्यूबवर मोफत उपलब्ध आहेत.

Advertisement
1/8
युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके
युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेली 7 भन्नाट मराठी नाटके

मराठी रंगभूमीने अनेक अजरामर नाटके प्रक्षकांना दाखवली. त्यातील काही नाटके युट्यूबवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत. खदखदून हसण्यासाठी ही नाटके नक्की बघा.

2/8
श्रीमंत दामोदर पंत
श्रीमंत दामोदर पंत

केदार शिंदे लिखित 'श्रीमंत दामोदर पंत' या नाटकाला 6.9 दशलक्ष व्ह्यूज आहेत. भरत जाधव आणि विजय चव्हाण यांची बाप-लेकाची जोडी तुम्हाला जबरदस्त आवडेल. हे नाटक फाजिल विनोद न करतासुध्दा हसवता येतं याचे उत्तम उदाहरण आहे . हसवण्याबरोबरच एकत्र कुटूंब पध्दतीचे महत्त्व आणि एकांताची गरज यातील समतोल राखण्याबद्दलचे संवाद मनाला भिडणारे आहेत.

3/8
पती सगळे उचापती
पती सगळे उचापती

रेश जयराम लिखित 'पती सगळे उचापती'  या नाटकाला 4.7 दशलक्ष व्ह्यूज आहेत .चेतन दळवींचा हजरजबाबीपणा आणि  विनोदबुध्दी या नाटकाला फार रंजक बनवते.

4/8
एका लग्नाची गोष्ट
एका लग्नाची गोष्ट

श्रीरंग गोडबोले लिखित 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाला 3.7 दशलक्ष व्ह्यूज आहेत. प्रशांत दामलेंची अस्खलित विनोद करण्याची क्षमता आणि हावभाव खुपच नैसर्गिक वाटतात, प्रशांत दामले आणि सुजाता जोशी यांची जोडी नाटक रंगवून ठेवते.

5/8
शांतेचं कार्ट चालू आहे
शांतेचं कार्ट चालू आहे

श्रीनिवास भणगे लिखित 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकाला 3 दशलक्ष व्ह्यूज आहेत. नाटकातील सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची जूगलबंदी खुपच मजेशीर आहे. नयनतारांचे सर्वच संवाद खदखदवून हसवणारे आहेत.

6/8
मोरूची मावशी
मोरूची मावशी

आचार्य अत्रे लिखित 'मोरूची मावशी' या नाटकाला 2.5 दशलक्ष व्ह्यूज आहेत. नाटकातील गाणी इतक्या वर्षांनंतरही चहात्यांना तोंडपाठ आहेत. विजय चव्हाणांनी साकारलेली स्त्री भूमिका फारच सूंदर आहे.

7/8
गेला माधव कुणीकडे
गेला माधव कुणीकडे

वसंत सबनीस लिखित 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाला 1.5 दशलक्ष व्ह्यूज आहेत  या नाटकात प्रशांत दामले आणि विनय येडेकरांची भूमिका आपल्याला हसवण्यात अजिबात कमी पडत नाहीत.

8/8
असा मी असामी
असा मी असामी

पु.ल.देशपांडे लिखित 'असा मी असामी' या नाटकाला 1.4 दशलक्ष व्ह्यूज आहेत .पु.लंच लेखन कीती सर्जनशील असतं हे सर्वंच मराठी दर्शक जाणून आहेत. नाटकात सतीश तारे,मंगेश कदम,अमिता खोपकर यांना त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी कौतूकाची थाप प्रेक्षकांनी दिली होती .





Read More