PHOTOS

शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यासाठी 7000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

Provide Daily Electricity to Farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Advertisement
1/4

7000 MW solar power plant to  farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिवसाही वीज देता यावी यासाठी 7000 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा वीजप्रकल्पाला (Solar Power Plant) राज्य सरकाने गती देण्याचे ठरवले आहे.  

2/4

वीज दरवाढीमुळे शेतकरी संकटात आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरसे वीज मिळत नसल्याने नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेत शेतकऱ्यांना वीजपुरवठा कसा करता येईल यावर भर देण्यात येत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

3/4

योजनेत आतापर्यंत 1513 मेगावॅट वीजखरेदीचे करार झाले आहेत, त्यापैकी 553 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि त्यातून 230 कृषी वाहिन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत क्रॉस सबसिडीचा भार कमी करुन उद्योगांना स्पर्धात्मक दरात वीजपुरवठा करावा अशीही मागणी आहे.

4/4

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेमुळे जवळपास 30 हजार कोटींची गुंतवणूक येईल. तसेच यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतील. सध्या या योजनेअंतर्गत 1513 मेगावॅटचे वीज खरेदी करार झालेत. यापैकी 553 मेगावॅट क्षमतेचे सोलर पॉवर प्रोजेक्ट तयारही झालेत. राज्यात सध्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेद्वारे तयार झालेला वीजपुरवठा सुरुही झाला आहे. 





Read More