PHOTOS

भारतीय चित्रपटसृष्टीतील 8 कलाकार जे लष्करी कुटुंबातून आले; शिस्त, देशभक्ती आणि सेवेच्या वारशातून आलेले चेहरे

लाकार केवळ अभिनयातच नव्हे, तर त्यांच्या पार्श्वभूमीमुळेही विशेष ठरतात. हे अभिनेते आणि अभिनेत्री सामान्य घरांमध्ये वाढलेले नाहीत. तर भार...

Advertisement
1/8
1. अनुष्का शर्मा
1. अनुष्का शर्मा

अनुष्काचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यामुळे तिचे बालपण आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये गेले. अनुष्काला लहानपणापासूनच शिस्त आणि जबाबदारी शिकवण्यात आली.

 

2/8
2. प्रियांका चोप्रा
 2. प्रियांका चोप्रा

प्रियांकाचे आई-वडील दोघेही आर्मी डॉक्टर होते. तिचे वडील डॉ. अशोक चोप्रा हे सैन्यात सर्जन होते. लष्करी जीवनशैलीचा तिच्यावर मोठा प्रभाव आहे.

3/8
3. सुष्मिता सेन
3. सुष्मिता सेन

माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचे वडील विंग कमांडर शुबीर सेन हे भारतीय हवाई दलात अधिकारी होते.

4/8
4. निमरत कौर
4. निमरत कौर

निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंग हे भारतीय लष्करात अधिकारी होते. ते काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत शहीद झाले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

5/8
5. गुल पनाग
5. गुल पनाग

गुल पनागचे वडील लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग हे भारतीय लष्करात उच्च पदावर कार्यरत होते. लहानपणापासून विविध सैनिकी कॅम्पमध्ये राहिल्यामुळे तिच्या जीवनशैलीवर त्याचा प्रभाव दिसून येतो.

6/8
6. रणविजय सिंग
6. रणविजय सिंग

एमटीव्ही रोडीजमुळे प्रसिद्ध झालेल्या रणविजयचे वडील लेफ्टनंट जनरल इक्बाल सिंग हे भारतीय लष्करात अधिकारी होते. रणविजय लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहत होता. पण नशीब त्याला मनोरंजन क्षेत्रात घेऊन आले.

7/8
7. नेहा धुपिया
7. नेहा धुपिया

नेहाचे वडील कमांडर प्रदीप सिंह धुपिया हे भारतीय नौदलात अधिकारी होते. त्यामुळे तिनेही लष्करी वातावरणात बालपण घालवले.

8/8
8. चित्रांगदा सिंग
8. चित्रांगदा सिंग

चित्रांगदाचे वडील कर्नल निरंजन सिंह हे लष्करात अधिकारी होते. ते हैदराबादच्या ई एम ई मध्ये गोल्फ प्रशिक्षक देखील होते.





Read More