buster:दरवर्षी डझनभर चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात, त्यापैकी काही असे असतात ज्यांची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत असतात. असाचं हा चित्रप...
दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी काही चित्रपट असे असतात, ज्यांची प्रेक्षक खूप काळापासून आतुरतेने वाट पाहत असतात. या चित्रपटांपैकी काही वेळोवेळी विविध कारणांमुळे पुढे ढकलले जातात आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरते. असाच एक बिग बजेट चित्रपट होता जो तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झाला आणि एकदा प्रदर्शित झाल्यावर त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं.
या चित्रपटाची घोषणा 2014 मध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळीच तो चर्चेचा विषय ठरला होता. 2016 मध्ये प्रथमच तो पुढे ढकलण्यात आला आणि त्यानंतर तब्बल सहा वेळा त्याच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. प्रत्येक वेळी उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांचा संयम संपू लागला.
हा चित्रपट म्हणजे 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन- शिवा'. प्रारंभी हा चित्रपट 2019 च्या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार होता. नंतर तो क्रिसमसपर्यंत पुढे गेला. पुन्हा सप्टेंबर 2020, मग डिसेंबर 2020 अशी तारीख बदलत गेली. मात्र, कोरोनामुळे सर्वच सिनेसृष्टी थांबली होती. अखेर, 9 सप्टेंबर 2022 रोजी 'ब्रह्मास्त्र' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याचे भरभरून स्वागत केले.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास 75 कोटी रुपयांची कमाई करत मोठी सुरुवात केली. नंतर काही दिवसांतच त्याचे जगभरात 418 कोटींचे कलेक्शन झाले. कोविडनंतरचा हा पहिलाच असा हिंदी चित्रपट ठरला, ज्याने मोठ्या प्रमाणावर लोकांना पुन्हा थिएटरकडे आकर्षित केलं.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र झळकले होते आणि त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी प्रेम दिले. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात दमदार VFX, कल्पक कथा आणि उत्कृष्ट पार्श्वसंगीत यांचं उत्तम मिश्रण होतं.
चित्रपटात शाहरुख खानची एक लहान पण लक्षवेधी भूमिका होती. प्रेक्षकांनी त्याला 'स्वदेश'मधील मोहन भार्गवशी जोडून पाहिलं. फार थोड्या लोकांना माहिती आहे की या चित्रपटाचं मूळ नाव 'ड्रॅगन' होतं. मात्र, कथानकातील पुरातन अस्त्रांच्या संकल्पनेनुसार नंतर त्याचं नाव 'ब्रह्मास्त्र' ठेवलं गेलं.
या सिनेमाचं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचं एकत्र असणं. जरी त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली नाही, तरी त्यांची उपस्थिती चित्रपटासाठी महत्त्वाची ठरली.
'ब्रह्मास्त्र'ने केवळ कमाईच्या बाबतीत विक्रम मोडले नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागाही निर्माण केली. आता चाहत्यांना याच्या पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट आहे आणि या भागात आणखी मोठ्या गोष्टी पाहायला मिळतील, अशी आशा व्यक्त होत आहे.