आजवर आपण अनेक सुंदर अशा अभिनेत्रींना पाहिलं. पण आज आम्ही तुम्हाला 80 च्या दशकातील अशा काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. त्यापैकी अनेक अभिनेत्री तर अशा आहेत ज्या विना मेकअपही चांगल्या दिसायच्या. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी विना मेकअप पाहिल्यानंतर त्यांना ओळखनं कठीण होईल.
चला तर एक नजर टाकूया त्या अभिनेत्रींवर
'प्यार झुकता नहीं' आणि 'वो सात दिन' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये पद्मिनी कोल्हापुरे यांनी काम केलं. त्या पडद्यावर खूप सुंदर दिसायच्या की लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. तर विना मेकअप अशा दिसायच्या पद्मिनी कोल्हापुरे.
अनीता राज या 'साजिश', 'असली नकली', 'एक और सिकंदर' आणि 'गुलामी' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसल्या. त्यानंतर त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या. तर ही अभिनेत्री विना मेकअप कशी दिसते एकदा पाहा.
'दूध का कर्ज', 'एक लड़का और एक लड़की', 'इल्जाम' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं स्थान मिळवणारी नीलम कोठारी अनेक वर्ष सगळ्यांच्या मनात घर करून होती. सध्या विना मेकअप नीलम कोठारे अशी दिसते.
तब्बूची मोठी बहीण फराह नाज देखील अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यात 'शिखर', 'अचानक','दिलजला' आणि 'ताकत' असे काही चित्रपट आहेत. पण लोकप्रियता मिळाल्यानंतर तिनं लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीपासून लांब झाली.
'तहलका', 'क्लर्क' आणि 'खून भरी मांग' या चित्रपटांमध्ये दिसलेली सोनू वालियानं देखील 80च्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळवली. पण तुम्ही कधी या चित्रपटात दिसणाऱ्या सोनू वालियाला विना मेकअप पाहिलं आहे का? तर सोनू वालिया विना मेकअप कशी दिसते ते पाहा.
'हम', 'रोटी की कीमत','जलजला', 'दरिया दिल', 'शिवा शक्ति' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली किमी काटकर देखील मोठ्या पडद्यापासून दूर झाली. जर तुम्ही तिला कधी विना मेकअप पाहिलं असेल तर तिला ओळखणं कठीण होईल.
(All Photo Credit : Social Media)