8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
सरकारी कारभार म्हणजे रॉयल कारभार असंच अेकजजण गृहित धरतात आणि आता हा समज आणखी दृढ होणार आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government jobs) पुन्हा नव्याने पगारवाढीचे संकेत दिले आहेत. एकिकडे सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला असतानाच दुसरीकडे पुन्हा नव्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार सहाव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त फरकानं सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होऊ शकते. सध्या 2024 च्या निवडणुका केंद्रस्थानी (Elections) असल्यामुळं त्यानंतरच आठव्या वेतन आयोगावर चर्चा होऊ लागते. सध्या प्राथमिक स्तरावर यासंर्भातील प्राथमिक चर्चा पुढे गेली असून, शासनाकडून सदर निर्णयासाठी समिती तयार केली जाण्याचीही शक्यता आहे.
आठव्या वेतन आयोगासाठी (8th Pay Commission ) महत्त्वाच्या चर्चा 2024 मध्ये होण्याचे संकेत असून, 2025-26 मध्ये तो लागूही होऊ शकतो. ज्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या फरकानं वाढ होऊ शकते. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात काही महत्त्वाचे बदलही केले जाऊ शकतात.
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) मुळं कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाली होती. आठव्या वेतन आयोगामध्ये याचाच आधार घेतला गेला, तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतनच (Basic Salary) 26 हजार रुपये इतकं असेल. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचं वार्षिक रिव्हीजन त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अवलंबून असतं. तर मोठे वेतन असणाऱ्यांचं रिव्हीजन 3 वर्षांच्या अंतरानं होऊ शकतं.