PHOTOS

90च्या दशकातील अभिनेत्री, जिच्यामुळे दाऊदच्या माणसांनी केली एका निर्मात्याची हत्या, अचानक झाली गायब

90च्या दशकातील या अभिनेत्रीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले होते नाव. एका निर्मात्याला गमवावा लागला होता जीव. 

Advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण काही अभिनेत्रींची नावं अंडरवर्ल्डशी जोडली गेली आहेत. अशीच एक अभिनेत्री होती अनीता अयूब. जी मूळची पाकिस्तानातील कराचीची रहिवासी होती. 

2/8

ती बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन भारतात आली होती. पण तिचं करिअर फार काळ टिकू शकलं नाही. तिच्या अचानक गायब होण्यामागे दाऊद इब्राहिम असल्याची चर्चा होती.

3/8

अनीता अयूबने पाकिस्तानमधील एका प्रायव्हेट कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. अभिनय शिकण्यासाठी ती मुंबईतील प्रसिद्ध रोशन तनेजा स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगमध्ये दाखल झाली. 

4/8

1993 मध्ये एका जाहिरातीच्या शूटसाठी भारतात आल्यावर तिची ओळख हिंदी सिनेमाचे दिग्गज देव आनंद यांच्याशी झाली. देव आनंद यांनी तिच्या जाहिरातीतील काम पाहून तिला आपल्या चित्रपटात संधी दिली. अशाप्रकारे तिने ‘प्यार का तराना’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

5/8

मात्र, अनीता अयूबचे बॉलिवूड करिअर फार काळ चालले नाही. 'गँगस्टर' नावाचा चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोन वर्षांतच ती इंडस्ट्रीमधून हद्दपार झाली. मात्र, तिची खरी चर्चा सुरू झाली दाऊद इब्राहिमच्या नावाने. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार अनीता आणि दाऊद यांचं रिलेशनशिप होतं. मात्र, अनीताने हे कधीच मान्य केलं नाही.

6/8

1995 साली जावेद सिद्दीकी नावाच्या एका बॉलिवूड निर्मात्याने अनीता अयूबला आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. यानंतर दाऊदच्या एका माणसाने दिवसाढवळ्या त्याची गोळ्या घालून हत्या केली. 

7/8

या घटनेनंतर अनीता अयूबच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण निर्माण झालं. रिपोर्टनुसार, 90 च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक लोकांना वाटत होतं की अनीता ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे. 

8/8

या संशयामुळे तिला आणखी कोणताही प्रोजेक्ट मिळाला नाही. या सर्व गोष्टींमुळे अनीता अयूबचं करिअर संपुष्टात आलं. सध्या अनीता अयूब सिनेसृष्टीपासून दूर आहे. ती न्यूयॉर्कमध्ये आपल्या बिझनेसमन पतीसोबत स्थायिक झाली असून एक सामान्य आयुष्य जगत आहे. 





Read More