Aadhaar Face Authentication: कोणी आधार कार्ड मागितलं तर तुम्ही पाकिटात हात घालून एक छोटं डॉक्यूमेंट दाखवता. पण आता तुमचा चेहराच तुमचे आधार कार्ड असेल, असं कोणी सांगितलं तर? हो, तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आता तुम्हाला सर्वत्र आधार कार्ड दाखवत राहायची गरज नाही. कारण आता तुमचा कागदपत्रांचा त्रास कायमचा संपणार आहे. तुम्हाला मिळणारी सेवा जलद आणि सुरक्षित होणार आहे.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे हे शक्य होणार आहे. ज्याद्वारे तुमची ओळख पडताळली केली जाईल. आता खाजगी कंपन्यादेखील आधार पडताळणी करू शकणार आहेत. जेणेकरून बँकिंग, प्रवास, आरोग्यसेवा आणि ई-कॉमर्स सारख्या सेवा ओळखपत्राचा पुरावा न दाखवता मिळू शकेल.
आता सेवांसाठी आधार कार्ड किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता राहणार नाही. ओळखीची पडताळणी फक्त फेस ऑथेंटिकेशनद्वारे केली जाईल. ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि त्रासमुक्त होईल.
पूर्वी आधार प्रमाणीकरण फक्त सरकारी सेवांपुरते मर्यादित होते. परंतु आता ही सुविधा खासगी कंपन्यांनाही देण्यात आली आहे. ई-कॉमर्स, प्रवास, आतिथ्य, आरोग्यसेवा, बँकिंग आणि विमा यासारख्या क्षेत्रातील खासगी कंपन्या आता आधार प्रमाणीकरणासह सेवा देऊ शकतील.
सोप्या आणि जलद सेवा 'जीवन सुलभतेला' प्रोत्साहन दिले जाणार आहे. आधार प्रमाणीकरणाची व्याप्ती वाढवल्याने नागरिकांचे जीवन सोपे होईल. कमी कागदपत्रे, जलद सेवा आणि अधिक सुरक्षिततेसह सेवा आता अधिक सोयीस्कर होतील.
आता प्रवास, हॉटेल बुकिंग, आरोग्यसेवा आणि बँकिंग यासारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्राची आवश्यकता नाही. फक्त कॅमेऱ्यासमोर तुमचा चेहरा दाखवल्याने, प्रमाणीकरण पूर्ण होईल आणि सेवा त्वरित उपलब्ध होईल.
बनावट कागदपत्रे किंवा चुकीच्या ओळखीची समस्या संपतील. कारण चेहरा ओळखणे म्हणजेच फेस आयडेंटिफिकेशन ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे. जलद, अचूक आणि पूर्णपणे सुरक्षित प्रमाणीकरण नागरिकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करेल.
ज्यांना OTP किंवा कागदपत्रे हाताळण्यात अडचण येते अशा वृद्ध आणि निरक्षर लोकांसाठी ही सर्वात सोपी पद्धत असेल. आता फक्त फेस स्कॅनद्वारे सेवा मिळू शकतात.
UIDAI फेस ऑथेंटिकेशनची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. अशावेळी चेहरा आधारित प्रमाणीकरण हे सरकार मान्यताप्राप्त आणि पूर्णपणे सुरक्षित असेल. संमतीशिवाय डेटा कुठेही वापरला जाणार नाही. तुमच्या गोपनीयता राखली जाणार आहे.
या दुरुस्तीमुळे सरकार आणि खासगी कंपन्यांमधील भागीदारी मजबूत होणार आहे. ज्यामुळे नवीन उपक्रम आणि डिजिटल सेवा वाढतील. नागरिकांना चांगल्या, जलद आणि पारदर्शक सेवांचा फायदा होणार आहे.