मुंबईत वरळी डोम येथे मनसे आणि शिवसेना यांचा विजयी मेळावा पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. तब्बल 19 वर्षांनंतर दोन्ही बंधू एकत्र आले.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या भेटीचीही चर्चा होतेय.
सुरुवातीला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे व्यासपीठावर एका बाजूला उभे होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोघांच्या हाताला धरून पुढे आणले.
सुप्रिया सुळे यांनी आग्रह केल्यानंतर दोन्ही बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे राहिले.
मेळावा संपल्यानंतर या दोन्ही भावांनीही एकत्रित फोटो काढला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा हा फोटो सर्वकाही सांगून जातो.
कित्येक वर्षांनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसेल. उद्धव-राज यांच्यासोबतच रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे. तर उजव्या बाजूला शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे आहेत.
उद्धव- राज यांच्याबाजूला उभे असलेले आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना पाहून अवघ्या महाराष्ट्रासाठी भावूक करणारा ठरला.
तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेदेखील मेळाव्यात आलेल्या प्रत्येक नेत्याची आवर्जून चौकशी करत होत्या.