PHOTOS

मालिका संपल्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री भर उन्हात करतेय काम, अवतार पाहून चाहते म्हणाले...

'आई कुठे काय करते' फेम मराठी अभिनेत्री शेतात करतेय काम. तुम्ही ओळखलं का? 

...
Advertisement
1/8

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साधेपणामुळे आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

2/8

या कलाकारांचा साधेपणा हा नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असतो. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा साधेपणा चर्चेत आला आहे. 

3/8

आम्ही 'आई कुठे काय करते' फेम मराठी लोकप्रिय अभिनेत्री आश्विनी महांगडे हिच्याबद्दल बोलत आहोत. 

4/8

आश्विनी महांगडे ही नेहमी तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी चाहत्यांना शेअर करत असते. तिचा हाच साधेपणा चाहत्यांना प्रचंड आवडतो. 

5/8

अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

6/8

आश्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शेतात काम करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये शेती हा एक संस्कार आहे, पुढच्या पिढीला तो देणे गरजेचे आहे. 

7/8

आज मुलांच्या हातात मोबाईल आहे पण वेळ आली तर स्वतःच्या पोटासाठी पिकवताही यायला हवे. मनगटात ताकद हवी आणि पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहता यायला हवे.

8/8

दुसऱ्यांना देण्याची दानत ही शेतकऱ्यांकडेच असते आणि हा गुण आपल्या मुलांनी घ्यायला हवा असं तिने म्हटलं आहे. तिच्या या साधेपणाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. 





Read More