AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय.
टीम इंडियाचा माजी वर्ल्ड कप विजेता सलामीवीर गौतम गंभीर याने अनेकदा धोनीवर खोचक टीका केली आहे.
वर्ल्ड कप धोनीने एकट्याने नाही तर आम्ही टीमने जिंकलाय. मात्र, मार्केटिंग मात्र नेहमी धोनीची केली जाते, असं गंभीर म्हणतो.
अशातच आता डिव्हिलिअर्सने देखील गंभीरच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यावेळी त्याने टीमच्या योगदानाबद्दल विधान केलं आहे.
मी कधीही वर्ल्ड कप जिंकलो नाहीये. आजच्या काळात लोक विसरले आहेत की, क्रिकेट एक संघ आहे.
लोक म्हणतात धोनीने विश्वचषक जिंकला, त्याने जिंकला. एमएस धोनी याने विश्वचषक जिंकला नव्हता, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. हे आपल्या डोक्यात ठेवा आणि विसरू नका, असं वक्तव्य डिव्हिलियर्सने केलं आहे.
लॉर्ड्समध्ये जॉस बटलरने ट्रॉफी उंचावली नव्हती, तर इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. एक संघ जेव्हा वर्ल्ड कप जिंकतो, तेव्हा सर्वांचा विजय असतो, असं डिव्हिलियर्स म्हणालाय.
टीममध्ये खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफ, निवडकर्ते, बोर्डाचे अधिकारी आणि राखीव खेळाडूंचं योगदान देखील असतं, असं देखील Mr. 360 म्हणाला आहे.