Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल.
आजोबा एक महान कवी, आई, वडील अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार. बॉलिवूडमधील नावाजलेले कुटुंब असल्याने या चिमुकल्याला आयुष्यात संघर्ष करावा लागला नसेल असा चाहत्यांना वाटतं.
आम्ही बोलतोय बीग बीचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याविषयी. आज त्याचा 48 वा वाढदिवस आहे.
त्याला पहिल्या चित्रपटसाठी खूप चप्पल घासावी लागली होती. साधारण दोन वर्षांनी अभिषेकला रिफ्युजी हा चित्रपट मिळाला होता.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, मीडियारिपोर्टनुसार अभिषेक बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी एलआयसी एजंट होता.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा आधार न घेता अभिषेकने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.
अभिषेक बच्चनने चार वर्षात 17 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अभिषेकने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत.
मीडियारिपोर्टनुसार अभिषेक बच्चन वयाच्या नवव्या वर्षीपासून एक गंभीर आजाराचा सामना करत आहे.
डिस्लेक्सिया असल्याच समोर आलं होत. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. ज्यामध्ये मुलांना शब्द ओळखता येत नाही. त्यामुळे त्यांना लिहिणं वाचण्याचा त्रास असतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे तारे जमीन पे हा चित्रपट.
अभिषेक बच्चनचा करिश्मा कपूरशी साखरपुडा तुटल्यानंतर 2007 मध्ये दोन वर्ष मोठ्या ऐश्वर्या रायसोबत लग्न झालं.
या दोघांना आराध्या नावाची मुलगी असून गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात तणाव आहे. एवढंच नाही तर ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.