Abhishek Bachchan Aishwarya Rai Relation: अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांमध्ये वाद असून दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अभिषेकने नुकत्याच या चर्चांवर भाष्य करताना अजूनही विवाहित आहे असं म्हटलं होतं. मात्र एका मुलाखतीमध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यात बेडरुममधील एका नियमाबद्दलची त्यांनी सूचित केलेलं. पाहूयात त्यांनी काय म्हटलेलं...
अभिषेक-ऐश्वर्या दोघे एकत्र एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचवेळी अभिषेकने दोघांमध्ये वाद होतात तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल सांगितलं होतं. जाणून घेऊयात तो नक्की काय म्हणालेला...
भारतीय मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय! अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या लग्नामध्ये दोघे एकत्र न येता वेगवेगळे आल्याने दोघांमधील वादाच्या चर्चेनं पुन्हा डोकं वर काढलं आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
मात्र अभिषेक बच्चनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजूनही विवाहित आहे, असं म्हणत या वादावर पडदा टाकला आहे. मात्र असं असलं तरी ऐश्वर्या बच्चन कुटुंबियांबरोबरच्या मतभेदामुळे वेगळी राहत असल्याचेही समजते.
सध्या या दोघांमध्ये मतभेदाची चर्चा असली तरी ऐश्वर्या रायने एका मुलाखतीमध्ये अभिषेक हा जगातील सर्वात हॅण्डसम पुरुष असल्याचं म्हटलं होतं. 'कपील शर्मा चॅट शो'मध्ये ऐश्वर्याने जगातील सर्वात हॅण्डसम पुरुष हा माझा पती आहे, असं ऐश्वर्या म्हणाली होती.
ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2011 साली त्यांना कन्यारत्नप्राप्ती झाली. या मुलीचं नाव त्यांनी आराध्य असं ठेवलं. अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या 13 वर्षीय आराध्यबरोबरच आली होती.
'कपील शर्मा चॅट शो'मध्येच अभिषेक बच्चननने त्याचा रोमान्स करण्याचा प्रयत्न कसा फसला होता याबद्दल माहिती दिलेली. कॅण्डल लाइट डिनर हा उत्तम प्लॅन असू शकतो असं वाटणाऱ्या पुरुषांना अभिषेकने स्वत:चा अनुभव सांगत सजग राहण्यास सांगितलं होतं.
"प्रत्येक पुरुषाला मी सांगू इच्छितो की समुद्रकिनाऱ्यावरील कॅण्डल लाइट डिनर हा सर्वात रोमॅण्टीक प्लॅन ठरत नाही. मी आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त (2009) मालदीवमध्ये असा प्लॅन केला होता मात्र त्याचा सगळा गोंधळ झाला," असं अभिषेक म्हणाला.
ऐश्वर्याबरोबरच्या कॅण्डल लाइट डिनरबद्दल आपला अनुभव हसत हसत सांगताना अभिषेकने समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्यामुळे मेणबत्त्या विजत होत्या, सतत उडणाऱ्या वाळूचा त्रास होत होता, यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधलं.
कॅण्डल लाइट डिनरऐवजी एकमेकांबरोबर छान वेळ घालवा, हेच फार रोमॅण्टीक असतं, असं अभिषेक म्हणाला होता. अभिषेकने तो ऐश्वर्याबरोबर अनेक तास गप्पा मारु शकतो असं सांगितलं होतं. अगदी संपूर्ण रात्रही त्यांनी गप्पा मारत काढल्याचं तो म्हणाला.
याच मुलाखतीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याबरोबर वाद झाला तर तो सोडवण्यासाठी आपणच पुढाकार घेतो असं आवर्जून सांगितलं होतं. अभिषेक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दोघांनी बेडरुमसंदर्भातील एक सिक्रेट सांगितलं होतं.
बेडवर जाताना राग मनात ठेवायचा नाही, असं या दोघांनी आपआपसात ठरवलं आहे. म्हणजेच मनात एकमेकांबद्दल राग ठेऊन दिवसाचा शेवट करायचा नाही यावर दोघांचं एकमत झालं आहे. खरं तर सुखी संसारासाठी अभिषेकने सांगितलेला हा मंत्र खरोखरच फायद्याचा ठरु शकतो.