PHOTOS

'पोज देताना मुलीबरोबर कसं..'; ऐश्वर्यासोबतच्या पहिल्याच फोटोशूटमध्ये अभिषेकची गोची! फोटोग्राफरचा खुलासा

Abhishek Bachchan Awkward Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. याच दरम्यान आता एक मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा असून यामध्ये या दोघांनी एकत्र पहिलं फोटोशूट केलेलं तेव्हा अभिषेकबरोबर काय घडलं होतं याबद्दलचा तपशील नमूद करण्यात आला आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...

Advertisement
1/11

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या पहिल्या फोटोशूटदरम्यान अभिषेक बच्चनला ऐश्वर्या रायसमोर प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. हे आम्ही नाही तर ऐश्वर्या-अभिषेकचं पहिलं फोटोशूट करणाऱ्यानेच म्हटलं आहे.

2/11

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या पहिल्या फोटोशूटच्या वेळेचे किस्से सांगितले होते. त्याचवेळेस त्याने सध्या कथित वादामुळे चर्चेत असलेल्या या जोडप्याबद्दल भाष्य केलं होतं. अभिषेकचा नेमका काय गोंधळ झालेला याबद्दल डब्बू रत्नानीने काय सांगितलं पाहूयात...

3/11

सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीमध्ये डब्बू रत्नानीने, "मीच अभिषेक आणि ऐश्वर्याचं पहिलं एकत्रित फोटोशूट केलं होतं. त्या दोघांनी एकत्र शूट केलेल्या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठीचं शुटींग स्वित्झर्लंडमध्ये झालं होतं," असं सांगितलं.

 

4/11

"मीच अभिषेक आणि ऐश्वर्याला पहिल्यांदा एकत्र पोज देत फोटो काढले आहेत. त्यावेळेस तो (अभिषेक) मला पोझ कशा द्यायच्या हे विचारत होता," असं डब्बु रत्नानीने सांगितलं. 

 

5/11

"'मी हे कसं करु?' असं तो नवा असल्याने सतत विचारायचा. 'मुलीबरोबर पोझ कशी देतात? मी यापूर्वी कधीच मुलीसोबत फोटोशूट केलेलं नाही,' असं तो मला सांगायचा," असं डब्बु रत्नानीने या फोटोशूटच्या आठवणी जागवताना म्हटलं.

6/11

"हा काळ ते दोघं एकमेकांना डेट करण्यापूर्वीचा होता. अभिषेक हा फार साधा माणूस आहे. तो फारच साधा असल्याने त्याला मुलीबरोबर पोज कशी द्यायची. तिला पोज देताना कसं पकडायचं (होल्ड करायचं) यासारख्या साध्या गोष्टीही ठाऊक नव्हत्या," असं अभिषेकबद्दल बोलताना डब्बू रत्नानीने सांगितलं.

7/11

"मला आजही आठवतंय की तो मला पोजसाठीच्या वेगवेगळ्या आयडीया विचारायचा. अर्थात हे पहिल्या काही दिवस झालं. नंतर आम्ही बराच काळ एकत्र शूट केल्यानंतर आम्ही सर्वजण एकमेकांबरोबर फार कम्फर्टेबल झालो," असं डब्बू रत्नानीने सांगितलं.

 

8/11

अभिषेक आणि ऐश्वर्याचा पहिला चित्रपट 'ढाई अक्षर प्रेम के' हा होता. अभिषेकने यापूर्वी 'व्होग'ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या फोटोशूटबद्दलच्या आठवणी सांगितलेल्या.

9/11

"मी ऐश्वर्याला पहिल्यांदा प्रोफेश्नली भेटलो ते 1999 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के'च्या फोटोशूटसाठी ती भेट होती. तो आमचा पहिला एकत्र चित्रपट होता. माझ्यासमोर डिव्हा असेल असं मला वाटलं होतं. मात्र ती त्याहूनही सुंदर होती," असं अभिषेक ऐश्वर्याबरोबरच्या भेटीसंदर्भात म्हणाला होता.

10/11

नंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये 'कुछ ना कहो', 'बंटी और बबली', 'गुरु', 'धूम-2' या चित्रपटांचा समावेश आहे. 

 

11/11

अभिषेक आणि ऐश्वर्याने एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 साली लग्न केलं आणि 2011 मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. 

 





Read More