'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गांवकर आणि रिलस्टार सोनाली विवाहबंधनात अडकले आहेत.
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गांवकर विवाहबंधनात अडकला आहे.
सोशल मीडिया रिलस्टार सोनाली गुरवसोबत अभिषेक गांवकरने लग्नगाठ बांधली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. अशातच आता दोघंही विवाहबंधनात अडकले आहेत.
चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर दोघांचे लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
राजश्री मराठीच्या इन्स्टाग्रामवर हँडलवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक गांवकर आणि सोनाली यांनी कोकणातल्या मालवणमध्ये सात फेरे घेतले आहेत