आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्यावर पैशाच्या बाबतीत कधीच विश्वास ठेवू नये.
आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अशा अनेक व्यक्तींचे वर्णन केले आहे. ज्यावर पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवू नये.
जर तुम्ही देखील अशा व्यक्तीवर पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
चाणक्य यांच्या मते, पैशाचा लोभी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये. असा माणूस फक्त नुकसानच करतो. तो पैसा मिळवण्यासाठी काहीही करू शकतो.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जे लोक पैशाचे लोभी असतात ते फक्त स्वत: च्या फायद्याचा आणि तोट्याचा विचार करत असतात. त्यांचे लक्ष फक्त पैसा कमवणे असते.
चाणक्य यांच्या मते, या लोकांपासून तुम्ही दूर राहणे चांगले. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
आचार्य चाणक्य म्हणतात की मित्र नेहमी विचार करूनच बनवावेत. त्यासोबतच माणसाची ओळख नेहमी चांगल्या संगतीत असावी.