TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कपल आहेत. जे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
शाहरुख खान- गौरी खान, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण आणि इतर अनेक जोडप्यांना बॉलिवूडच्या पॉवर कपलचा टॅग मिळाला आहे.
नुकताच TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंट अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांची टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. दोघांचे देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची भेट 'इंटरनेशनल खिलाड़ी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांच्या लग्नाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत.
TAM AdEx अहवालात आणखी दोन बॉलीवूड जोडप्यांची नावे समाविष्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन-जया बच्चन.
TAM AdEx अहवालात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दुसऱ्या जोडप्याचे नाव आहे. दोघांचे देखील सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.