गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.
'स्त्री 2' चित्रपटाने हृतिक रोशनच्या 'फाइटर' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'फाइटर' हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. मात्र, 'स्त्री 2' ने या चित्रपटाला मागे टाकत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
'स्त्री 2' च्या यशावर आता ह्रतिक रोशनने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने 'स्त्री 2' चित्रपटाच्या निर्मात्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ह्रतिक रोशन याने त्याच्या X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, आमच्या सिनेमासाठी ही खूप आनंदाची वेळ आहे. कारण 'स्त्री 2' ने सर्वांसाठी नवीन स्तर निर्माण केला आहे.
'स्त्री'चा पहिला भाग हा खूपच शानदार होता. त्याच कल्पनेतून 'स्त्री 2' सारखा चित्रपट बनवणे खूप कौतुकास्पद आहे.
'स्त्री 2' च्या यशाबद्दल संपूर्ण कलाकार आणि 'क्रू'चे अभिनंदन. आम्हाला चित्रपटांमध्ये असे आणखी आनंदाचे क्षण मिळत राहतील.
ह्रतिक रोशनच्या 'फायटर' चित्रपटाने जगभरात 358 कोटी रुपयांची कमाई केली. तर 'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात 810 कोटींची कमाई केली आणि 2024 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.