कधी काळी कोथिंबीर विकली, त्यानंतर वॉचमन म्हणून काम केलं. आता ठरला बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणार अभिनेता. कोण आहे तो अभिनेता?
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केला आहे. मग तो शाहरुख खान असो किंवा अमिताभ बच्चन. असाच एका अभिनेत्याचा संघर्ष आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल तुम्हाला बोलत आहोत त्याचे नाव नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. अभिनेत्याचे बालपण गरिबीमध्ये गेलं पण आता तो 96 कोटींचा मालक आहे.
अभिनेत्याने कोथिंबीर विकली. त्यानंतर अभिनेत्याने मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आणि काही काळातच तो इंडस्ट्रीमध्ये आला आणि स्टार झाला.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म हा यूपीमधील एका गावात झाला होता. त्याने रसायनशास्त्रातून पदवी घेतलीआहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने केमिस्ट म्हणून काम देखील केलं.
त्यानंतर अभिनेता म्हणून त्याचे मोठ्या पडद्यावर येण्याचे स्वप्न होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी दिल्लीला आला.
नवाजुद्दीन सिद्दीकीला अभिनेता होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तो दिल्लीमध्ये मित्रांकडून पैसे उधार घेत असायचा. त्यासोबत नोकरी देखील करायचा.
अभिनेता म्हणाला की, मी कधी कधी वॉचमन म्हणून काम केलं आणि अभिनयाच्या कार्यशाळा केल्या. तर काही लोकांनी माझ्या लूकची खिल्ली देखील उडवली असं नवाजुद्दीन म्हणाला.