ना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहिलं आहे. परंतु, कमी लोकांना माहिती आहे की, दोघांना एकत्र घेऊन आणखी दोन चित्रपट बनवले जाणार...
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमकथेचे साक्षीदार आजही इंडस्ट्रीमध्ये आहेत. मोठ्या पडद्यावर देखील सलमान आणि ऐश्वर्याची जोडी खूप प्रसिद्ध होती.
जेव्हा पहिल्यांदा दोघांनी 'एकत्र हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम केलं. त्यांचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या जवळ आले.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का, सलमान खान आणि ऐश्वर्या राय आणखी दोन चित्रपटांसाठी एकत्र आले होते. मात्र, काही कारणास्तव हे दोन्ही चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकले नाहीत.
सलमानचे अनेक चित्रपट रखडले असले तरी, या दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान मोठ्या पडद्यावर ऐश्वर्या रायसोबत रोमान्स करताना दिसला असता.
2003 मध्ये दीपा मेहता 'साहब बीवी और गुलाम' या चित्रपट दिग्दर्शित करणार होत्या. या चित्रपटासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची निवड करण्यात आली होती.
परंतु, काही कारणास्तव नंतर चित्रपटाचा दिग्दर्शक बदलला. त्यानंतर चित्रपटातील कलाकार बदलण्यात आले. सलमान-ऐश्वर्याच्या जागी प्रियांका चोप्रा, विद्या बालन आणि जॉन अब्राहम यांना कास्ट करण्यात आले. त्यानंतर हा चित्रपट पुढे बनवण्यात आला नाही.
1994 मध्ये 'खामोशी' चित्रपटासाठी सलमान-ऐश्वर्या रायला कास्ट करण्यात आले होते. सलमान आणि ऐश्वर्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये अतुल अग्निहोत्री, आयशा झुल्का आणि अनुपम खेर यांची नावे होते. उत्तम स्टारकास्ट असून देखील हा चित्रपट निर्माण झाला नाही.